शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

CoronaVirus : फुटबॉल सामन्यातून कोरोनाने मारली इटलीत ‘एन्ट्री’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 3:56 AM

यूईएफए चॅम्पियन्स लीगमधील इटालियन क्लब अटलांटा आणि स्पेनचा क्लब व्हॅलेंसिया यांच्यात १९ फेब्रुवारीला मिलान येथील सॅन सिरो स्टेडियमवर झालेला सामना पाहण्यासाठी ४० हजार प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित होते.

मिलान : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील क्रीडा घडामोडी थांबविण्यात आल्या असून अनेक देशही लॉकडाऊन करण्यात आले आहेत. आतापर्यंत जगभरात ५ लाख ३६ हजार ४५४ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. चीनपासून सुरुवात झालेल्या या विषाणूने जगभरात थैमान घातले. याची मोठी किंमत चीनने मोजली असली, तरी आता इटलीला त्याहून मोठा धक्का बसत आहे. जगभरात कोरोनाने सर्वाधिक बळी इटलीमध्ये घेतले आहेत. इटलीत कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्यामागचे कारण एक फुटबॉल सामना असल्याचा दावा करण्यात आला असल्याने सर्वच क्रीडाप्रेमींना आता धक्का बसला आहे.यूईएफए चॅम्पियन्स लीगमधील इटालियन क्लब अटलांटा आणि स्पेनचा क्लब व्हॅलेंसिया यांच्यात १९ फेब्रुवारीला मिलान येथील सॅन सिरो स्टेडियमवर झालेला सामना पाहण्यासाठी ४० हजार प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित होते. चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातील पहिल्या लीग सामन्यात अटलांटाने ४-१ असा विजय मिळवला. या सामन्यानंतर आठवड्याभरात उत्तर इटलीत कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. या सामन्यासाठी बेर्गामो येथील ४० हजार चाहते मिलान येथून घरच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी आले होते. याच बेर्गामो येथे कोरोना विषाणूचा मोठा प्रभाव आढळून येत आहे. येथे जवळपास ६ हजार ७०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. इटलीतील ही परिस्थिती पाहता सिरी ए इटालियन लीग ९ मार्चपासून स्थगित करण्यात आली. बेर्गामो येथील उत्तरपूर्व शहरात ६०० पैकी १३४ जण कोरोनामुळे आजारी पडल्याची अधिकृत माहिती मिळाली. यापूर्वी अटलांटाचा गोलरक्षक मार्को स्पोर्टिलो हाही कोरोना पॉझिटिव्ह आढळला.त्यानंतर इटलीतील सीरि ए लीगमध्ये आतापर्यंत १५ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह म्हणून सापडले आहेत. व्हॅलेंसिया क्लबनेही त्यांच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले.तसेच इटालियन लीग विजेत्या युव्हेंटस क्लबमधील पाऊलो डीबाला, ब्लेस मातूडी आणि डॅनिेल रुगानी हेही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.महापौरांनीही केला दावाबेर्गामो महापौर जॉर्जिओ गोरी यांनीही चॅम्पियन्स लीगमुळे कोरोना व्हायरस पसरला असल्याचा दावा केला आहे. ‘हा सामना पाहण्यासाठी ४० हजार लोकांनी मिलान येथे प्रवास केला. उर्वरित लोकं घरातून किंवा पब व बारमध्ये सामना पाहत होते. त्या रात्री कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला असेल, हे नक्की,’ असे गोरी यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFootballफुटबॉल