शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
3
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
4
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
5
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
6
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
7
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
8
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
9
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
10
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
11
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
12
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
13
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
14
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
15
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
16
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
17
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
18
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
20
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

Shocking: इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्याची कोरोनाशी झुंज अपयशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 17:12 IST

गेल्या आठवड्यात त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते...

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 21 लाख 82,823 इतकी झाली असून 1 लाख 45,551 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पण, दिलासादायक बाब म्हणजे 5 लाख 47,679 लोकं बरी झाली आहेत. कोरोना व्हायरसची झळ क्रीडा क्षेत्रालाही बसली आहे. इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या फुटबॉल संघाचे सदस्य आणि लिड्स युनायटेड क्लबचे दिग्गज फुटबॉलपटू नॉर्मन हंटर यांचे शुक्रवारी कोरोना व्हायरसमुळे निधन झाले. ते 76 वर्षांचे होते.  

''गेल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना वाचवण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु आज सकाळी त्यांचे निधन झाले,'' असे लिड्स क्लबने सांगितले. नॉर्मन हे वर्ल्ड कप विजेत्या संघाचे सदस्य होते, परंतु त्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यांनी लीड्स क्लबला दोन जेतेपद पटकावून दिली होती. 29 ऑक्टोबर 1943 मध्ये त्यांचा जन्म झाला. लीड्स क्लबसाठी त्यांनी 726 सामने खेळे आणि त्यात त्यांनी 21 गोल केले. 1962 ते 1976 या कालावधीत ते लीड्स साठी खेळले. त्यानंतर 1976 ते 1979 या कालावधीत ब्रिस्टल सिटी आणि 1979 ते 1982 या कालावधीत बर्न्सले क्लबचे प्रतिनिधित्व केले. 

नॉर्मन यांनी 1964 ते 1965 कालावधीत इंग्लंडच्या 23 वर्षांखालील आणि 1965 ते 1974 या कालावधीत इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले. खेळाडू म्हणून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्यांनी 1980 ते 1990 मध्ये ते संघाचे व्यवस्थापक होते.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडFootballफुटबॉल