शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

Copa America 2024 draw जाहीर! २०१९ चे फायनलिस्ट अर्जेंटिना-चिली एकाच गटात, ब्राझिलसमोर कट्टर प्रतिस्पर्धी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2023 3:26 PM

Copa America 2024 draw:  २०१५ आणि २०१६ च्या फायनलमधील पराभवाचा बदला घेण्याच्या उद्देशाने लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिना संघ आगामी कोपा अमेरिका २०२४ मध्ये चिलीशी भिडणार आहेत.

Copa America 2024 draw:  २०१५ आणि २०१६ च्या फायनलमधील पराभवाचा बदला घेण्याच्या उद्देशाने लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिना संघ आगामी कोपा अमेरिका २०२४ मध्ये चिलीशी भिडणार आहेत. दक्षिण अमेरिकेतील १० आणि CONCACAF मधील सहा संघांसह १६ संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा यूनायटेड स्टेट्समध्ये होणार आहे. गत कोपा अमेरिका चॅम्पियन आणि विश्वविजेता अर्जेंटिनाचा संघ २० जून २०२४ अटलांटा येथे कॅनडा किंवा त्रिनिदाद आणि टोबॅगो विरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करतील. हे दोन्ही संघ CONCACAF स्लॉटपैकी एकासाठी प्लेऑफमध्ये भिडणार आहेत. 

त्यानंतर अर्जेंटिनाचा सामना २५ जून रोजी ईस्ट रुदरफोर्ड, न्यू जर्सी येथे चिलीशी होईल. २०१६ कोपा अमेरिका फायनलमध्ये दोन्ही संघ भिडले होते. याआधी २०१५ च्या अंतिम फेरीत संघ एकमेकांशी भिडले होते, जिथे मेस्सीने शूटआउटमध्ये पेनल्टी चुकवली होती. अर्जेंटिना २९ जून रोजी मियामी येथे पेरूविरुद्ध अ गटातील त्यांचा शेवटचा साखळी सामना खेळतील.  

इतर गटांमध्ये, मेक्सिको गट ब मध्ये इक्वेडोर, व्हॅनेझुएला आणि जमैका यांच्याशी स्पर्धा करतील, तर युनायटेड स्टेट्सचा सामना उरुग्वे, पनामा आणि बोलिव्हिया यांच्याशी क गटात होईल. ब्राझील त्यांच्या २०२१च्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर ड गटात कोलंबिया, पॅराग्वे आणि कोस्टा रिका किंवा होंडुरास विरुद्ध खेळतील.  २०२४ची कोपा अमेरिकेकडे ही उत्तर अमेरिकेतील २०२६ वर्ल्ड कप स्पर्धेची चाचणी म्हणून पाहिले जात आहे. ब्राझील २४ जून रोजी कोस्टा रिका किंवा होंडुरास विरुद्ध कॅलिफोर्निया येथे पहिला सामना खेळतील. त्यानंतर २८ जून रोजी पॅराग्वे आणि २ जुलै रोजी कोलंबिया यांच्याविरुद्ध खेळेल. या स्पर्धेसाठी १४ स्टेडियम वापरण्यात येतील, अंतिम सामना १४ जुलै रोजी मियामी येथे होईल.  

अर्जेंटिनाने अ गटात अव्वल स्थान पटकावल्यास, ४ जुलै रोजी ह्यूस्टनच्या एनआरजी स्टेडियमवर उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना ब गटातील उपविजेत्याशी होईल. उपांत्य फेरीचे सामने ९ आणि १० जुलै रोजी होतील.  

टॅग्स :Argentinaअर्जेंटिनाBrazilब्राझीलLionel Messiलिओनेल मेस्सी