Copa America 2024 draw जाहीर! २०१९ चे फायनलिस्ट अर्जेंटिना-चिली एकाच गटात, ब्राझिलसमोर कट्टर प्रतिस्पर्धी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 03:26 PM2023-12-08T15:26:30+5:302023-12-08T15:27:58+5:30

Copa America 2024 draw:  २०१५ आणि २०१६ च्या फायनलमधील पराभवाचा बदला घेण्याच्या उद्देशाने लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिना संघ आगामी कोपा अमेरिका २०२४ मध्ये चिलीशी भिडणार आहेत.

Copa America 2024 draw: Argentina face Chile in 2019 final replay, Brazil drawn with Colombia with all eyes on underdogs Ecuador | Copa America 2024 draw जाहीर! २०१९ चे फायनलिस्ट अर्जेंटिना-चिली एकाच गटात, ब्राझिलसमोर कट्टर प्रतिस्पर्धी 

Copa America 2024 draw जाहीर! २०१९ चे फायनलिस्ट अर्जेंटिना-चिली एकाच गटात, ब्राझिलसमोर कट्टर प्रतिस्पर्धी 

Copa America 2024 draw:  २०१५ आणि २०१६ च्या फायनलमधील पराभवाचा बदला घेण्याच्या उद्देशाने लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिना संघ आगामी कोपा अमेरिका २०२४ मध्ये चिलीशी भिडणार आहेत. दक्षिण अमेरिकेतील १० आणि CONCACAF मधील सहा संघांसह १६ संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा यूनायटेड स्टेट्समध्ये होणार आहे. गत कोपा अमेरिका चॅम्पियन आणि विश्वविजेता अर्जेंटिनाचा संघ २० जून २०२४ अटलांटा येथे कॅनडा किंवा त्रिनिदाद आणि टोबॅगो विरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करतील. हे दोन्ही संघ CONCACAF स्लॉटपैकी एकासाठी प्लेऑफमध्ये भिडणार आहेत. 


त्यानंतर अर्जेंटिनाचा सामना २५ जून रोजी ईस्ट रुदरफोर्ड, न्यू जर्सी येथे चिलीशी होईल. २०१६ कोपा अमेरिका फायनलमध्ये दोन्ही संघ भिडले होते. याआधी २०१५ च्या अंतिम फेरीत संघ एकमेकांशी भिडले होते, जिथे मेस्सीने शूटआउटमध्ये पेनल्टी चुकवली होती. अर्जेंटिना २९ जून रोजी मियामी येथे पेरूविरुद्ध अ गटातील त्यांचा शेवटचा साखळी सामना खेळतील.  

इतर गटांमध्ये, मेक्सिको गट ब मध्ये इक्वेडोर, व्हॅनेझुएला आणि जमैका यांच्याशी स्पर्धा करतील, तर युनायटेड स्टेट्सचा सामना उरुग्वे, पनामा आणि बोलिव्हिया यांच्याशी क गटात होईल. ब्राझील त्यांच्या २०२१च्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर ड गटात कोलंबिया, पॅराग्वे आणि कोस्टा रिका किंवा होंडुरास विरुद्ध खेळतील.  
२०२४ची कोपा अमेरिकेकडे ही उत्तर अमेरिकेतील २०२६ वर्ल्ड कप स्पर्धेची चाचणी म्हणून पाहिले जात आहे. ब्राझील २४ जून रोजी कोस्टा रिका किंवा होंडुरास विरुद्ध कॅलिफोर्निया येथे पहिला सामना खेळतील. त्यानंतर २८ जून रोजी पॅराग्वे आणि २ जुलै रोजी कोलंबिया यांच्याविरुद्ध खेळेल. या स्पर्धेसाठी १४ स्टेडियम वापरण्यात येतील, अंतिम सामना १४ जुलै रोजी मियामी येथे होईल.  


अर्जेंटिनाने अ गटात अव्वल स्थान पटकावल्यास, ४ जुलै रोजी ह्यूस्टनच्या एनआरजी स्टेडियमवर उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना ब गटातील उपविजेत्याशी होईल. उपांत्य फेरीचे सामने ९ आणि १० जुलै रोजी होतील.  

Web Title: Copa America 2024 draw: Argentina face Chile in 2019 final replay, Brazil drawn with Colombia with all eyes on underdogs Ecuador

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.