शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रोनाल्डोची रिप्लेसमेंट करणार चेल्सीचा हा स्टार खेळाडू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 14:01 IST

युव्हेंट्सने सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोला करारबद्ध केले आणि  रेयाल माद्रिद क्लबला मोठी धक्का दिला. रोनाल्डोनंतर रेयालचा स्टार कोण, याची चिंता सर्वांना सतावत होती.

मुंबई - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनंतर खेळाडूंच्या ट्रान्सफरसाठी चढाओढ सुरू झाली आहे. युव्हेंट्सने सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोला करारबद्ध केले आणि  रेयाल माद्रिद क्लबला मोठी धक्का दिला. रोनाल्डोनंतर रेयालचा स्टार कोण, याची चिंता सर्वांना सतावत होती. पण, याचे उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी बेल्जियमचा कर्णधार आणि चेल्सीच्या स्टार खेळाडूशी रेयालने सुरू केलेली चर्चा अंतिम टप्प्यात आहे. विश्वचषक स्पर्धेतील बेल्जियमच्या स्वप्नवत वाटचालीला उपांत्य फेरीत फ्रान्सने ब्रेक लावला. त्यानंतर बेल्जियमचा कर्णधार इडन हॅझार्डने रेयाल माद्रिद क्लबकडून खेळणार असल्याचे संकेत दिले होते. तो म्हणाला, चेल्सीसोबतच सहा वर्षांचा अविस्मरणीय प्रवास सोडण्याची वेळ आली आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर मी दुस-या क्लबच्या शोधात होतो. नव्या क्लबसोबत जायचे की नाही हा निर्णय मी घेणार आहे, परंतु अंतिम निर्णय हा चेल्सी क्लबचा असेल. मला नक्की कुठे जायचे आहे, याची तुम्हाला कल्पना आहेच. ले 10 स्पोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार रेयाल माद्रिद आणि चेल्सी यांच्यात हॅझार्डसाठी 190 कोटी युरोचा करार झाला आहे. चॅम्पियन्स लीगमधील गतविजेत्या रेयालने हॅझार्डच्या वडीलांसोबत करारासंदर्भात चर्चा केली आहे आणि त्याचवेळी त्यांनी चेल्सीसोबतही वाटाघाटीला सुरूवात केलेली आहे. इटलीमधील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार हॅझार्डचे वकील, वडील आणि रेयाल यांच्यात बैठक झाली असून रेयालने 125 कोटी युरोची ऑफर दिल्याचे समोर येत आहे. चेल्सीचा सहकारी चेस फॅब्रेगासने हॅझार्डला भावनिक आवाहन केले आहे. तो म्हणाला, हॅझार्ड हा आमचा सर्वोत्तम खेळाडू आहे. इंग्लिंश प्रीमिअर लीगमधील आमच क्लब सर्वोत्तम आहे आणि पुढील सत्रातही यात सातत्य राखायचे आहे. त्यासाठी आम्हाला सर्वोत्तम खेळाडू हवेत, त्यापैकी हझार्ड हा एक आहे. त्याच्यासोबत मला खेळायला आवडते. 

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉलSportsक्रीडा