शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चांदनी चौक टू चायना... भारतीय फुटबॉल संघ निघाला 'ड्रॅगन'च्या देशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 16:05 IST

आशियाई चषक स्पर्धेच्या पुर्वतयारीसाठी जागतिक क्रमवारीत आघाडीवर असलेल्या संघांविरूद्ध भारतीय खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी, अशी मागणी कर्णधार सुनील छेत्री केली होती.  ही मागणी मान्य करताना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने चीनविरूद्ध आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढतीचे आयोजन केले आहे.

नवी दिल्ली - आशियाई चषक स्पर्धेच्या पुर्वतयारीसाठी जागतिक क्रमवारीत आघाडीवर असलेल्या संघांविरूद्ध भारतीय खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी, अशी मागणी कर्णधार सुनील छेत्री केली होती.  ही मागणी मान्य करताना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने चीनविरूद्ध आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढतीचे आयोजन केले आहे. फिफाच्या वेळापत्रकानुसार ऑक्टोबरमध्ये ही लढत होण्याची शक्यता आहे.फिफा क्रमवारीत भारतीय संघ 97 व्या स्थानावर आहे आणि 75व्या क्रमांकावर असलेल्या चीनविरूद्ध खेळण्यासाठी हा संघ 8 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत बीजिंगला जाणार आहे. या सामन्याची अधिकृत तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. भारतीय महासंघाने 13 ऑक्टोबरचा प्रस्ताव ठेवला आहे. भारत आणि चीन यांच्यात आत्तापर्यंत 17 सामने झाले आहेत आणि हे सर्व सामने भारतीय भूमीत झालेले होते. उभय संघ 1997 मध्ये नेहरू चषक स्पर्धेत कोची येथे अखेरचे एकमेकांविरूद्ध खेळले होते. भारताचा 16 वर्षांखालील संघ चीनमध्ये  नुकत्याच झालेल्या चार देशांच्या निमंत्रित स्पर्धेत सहभाग झाला होता. यामध्ये थायलंड आणि कोरिया प्रजासत्ताक संघांचाही समावेश होता. ऑक्टोबरमध्ये होणारा हा मैत्रीपूर्ण सामना भारताच्या एएफसी आशिया चषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. ही स्पर्धा जानेवारी 2019 मध्ये संयुक्त अरब अमिराती येथे खेळवली जाणार आहे. भारताला चीनविरूद्ध एकही विजय मिळवता आलेला नाही. 17 पैकी 12 सामने चीनने जिंकले आहेत आणि पाच सामने बरोबरीत सुटले आहेत. मात्र, भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म पाहता चीनची कसोटी लागणार आहे. भारतीय संघाने जून 2016 ते नोव्हेंबर 2017 पर्यंत सलग 12 सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टनटाइन यांनी ही खेळाडूंसाठी मोठी संधी असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, आशियाई चषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघाला यापेक्षा चांगली संधी मिळू शकत नाही. खेळाडू या संधीचे सोनं करतील असा मला विश्वास आहे.  

 

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारतSportsक्रीडा