शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

चॅम्पियन्स लीग : रियाल माद्रिदचे वर्चस्व संपविण्यास लिव्हरपूल प्रयत्नशील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 00:22 IST

मोहम्मद सालाहच्या शानदार फॉर्मच्या जोरावर लिव्हरपूरलचे लक्ष शनिवारी खेळल्या जाणाऱ्या यूएफा चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये बलाढ्य रियाल माद्रिदचे वर्चस्व संपविण्यावर केंद्रित झाले आहे.

ठळक मुद्देरोमांचक अंतिम सामन्याकडे फुटबॉलविश्वाचे लक्ष; मोहम्मद सालाह, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यावर लक्ष

किव्ह : मोहम्मद सालाहच्या शानदार फॉर्मच्या जोरावर लिव्हरपूरलचे लक्ष शनिवारी खेळल्या जाणाऱ्या यूएफा चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये बलाढ्य रियाल माद्रिदचे वर्चस्व संपविण्यावर केंद्रित झाले आहे. त्याचवेळी स्पॅनिश क्लब रियाल माद्रिदचे सलग तिसरे विजेतेपद पटकावण्यास प्रयत्न असतील.

रियाल माद्रिदने तब्बल १२ युरोपियन चषक पटकाविले असून शनिवारी खेळल्या जाणाºया अंतिम लढतीत त्याची संख्या १३ करण्यास उत्सुक आहे. लिव्हरपूलने पाचवेळा हा चषक जिंकला आहे. यापूर्वी २००५ मध्ये त्यांनी जेतेपद पटकावले होते.रियालने प्रथम सलग पाचवेळा युरोपियन चषक जिंकले होते आणि आता, पाच वर्षांत चौथ्यांदा चॅम्पियन्स लीग ट्रॉफीवर नाव कोरण्यास प्रयत्नशील आहे.

या निर्णायक सामन्यात लिव्हरपूलपुढे कडवे आव्हान राहणार आहे. कारण एटलेटिको माद्रिद (दोनदा) आणि युवेंट्स हालच्या अंतिम फेरीत स्टार फॉरवर्ड ख्रिस्टियानो रोनाल्डोला रोखण्यात अपयशी ठरले आहेत. लिव्हरपूलच्या खेळाडूंना आक्रमकतेमुळे अधिक विश्वास वाटत आहे. त्यामुळे युक्रेनच्या राजधानीमध्ये असलेल्या आॅलिम्पिक स्टेडियममध्ये ही लढत रंगतदार होण्याची खात्री आहे. इतिहासाचा विचार करता ही स्वप्नवत अंतिम लढत होईल, अशी आशा आहे.

११वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अंतिम फेरीत धडक मारलेला लिव्हरपूल संघ १२वेळचा चॅम्पियन रियाल माद्रिदचे तगडे आव्हान सज्ज आहे. विशेष म्हणजे तब्बल ३७ वर्षांनंतर उभय संघ विजेतेपदाच्या ‘हायव्होल्टेज’ सामन्यात लढतील. (वृत्तसंस्था)

ऐतिहासिक कामगिरी करण्याचा निर्धाररियाल माद्रीदने जेतेपद पटकावले तर १९७६ मध्ये बायर्ननंतर सलग तीनदा युरोपियन चषक जिंकणारा पहिला संघ ठरेल. रोनाल्डो आपले पाचवे चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावू शकतो. त्यासोबत तो वैयक्तिक विक्रमाची बरोबरी साधताना आणखी एक ‘बॅलन डिओर’चा दावेदार ठरेल. विशेष म्हणजे फुटबॉल लिजंड झिनेदीन झिदानही प्रशिक्षक म्हणून चॅम्पियन्स लीगचे सलग तिसरे विजेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

शानदार प्रवास करण्यास लिव्हरपूल सज्जलिव्हरपूल संघाने यंदाच्या मोसमात विक्रमी ४६ गोल नोंदवले असून त्यापैकी ११ गोल सालाहने केले आहेत.लिव्हरपूलच्या वेबसाईटवर क्लोप म्हणाले की,‘जर जेतेपद पटकावले तर ‘किव्ह व अंतिम फेरीचा प्रवास’ हा आतापर्यंतचा शानदार प्रवास राहील.’दरम्यान संघात अनुभवाची उणीव भासत आहे. कारण संघातील एकही खेळाडू यापूर्वी चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत खेळलेला नाही, पण क्लोप यांना कल्पना आहे की, झिनेदिन झिदानचा संघ त्यांना कमी लेखू शकत नाही.

टॅग्स :Footballफुटबॉल