बायचुंग भूतिया आता देणार फुटबॉलचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 06:15 PM2019-01-04T18:15:31+5:302019-01-04T20:58:54+5:30

फुटबॉलचा विकास व्हावा आणि चांगले फुटबॉलपटू घडावेत, यासाठी भूतियाने मुंबईमध्ये हे शिबीर घेण्याचे ठरवले आहे.

baichung bhutia now giving football lessons | बायचुंग भूतिया आता देणार फुटबॉलचे धडे

बायचुंग भूतिया आता देणार फुटबॉलचे धडे

Next

मुंबई : भारताचा माजी महान फुटबॉलपटू बायचुंग भूतियाने निवृत्तीनंतर खेळाडू घडवण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठीच बायचुंग भूतिया फुटबॉल स्कूलची स्थापना केली आहे. आता भूतिया मुंबईमध्ये फुटबॉवचे धडे देण्यासाठी रविवारी येणार आहे. मुंबईतील के.जे. सोमय्या महाविद्यालयामध्ये येत्या रविवारी सकाळी 10.30 वाजल्यापासून शिबीर घेणार आहे. या शिबीरामध्ये 2003-2008 या वर्षांतील खेळाडू सहभागी होऊ शकतात.

भूतियाने आपले फुटबॉल स्कूल हरयाणामध्ये स्थापन केले आहे. पण फुटबॉलचा विकास व्हावा आणि चांगले फुटबॉलपटू घडावेत, यासाठी भूतियाने मुंबईमध्ये हे शिबीर घेण्याचे ठरवले आहे. सध्याच्या घडीला या स्कूलच्या निवासी अकादमीमध्ये 53 विद्यार्थी आहेत. या 53 पैकी 16 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी श्रुती गोयल यांच्याशी या क्रमांकावर  9810725996 किंवा stuti.goyal@bbfootballschools.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: baichung bhutia now giving football lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.