शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

खेळाडूंना कवडी अन् ज्योतिषांना 16 लाख; भारतीय संघाच्या उज्वल वाटचालीसाठी संघटनेचा अजब घाट! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 12:50 IST

युवा खेळाडूंसाठी लीग घेण्यात असमर्थ ठरणाऱ्या AIFF कडून पैशांचा असा दुरूपयोग चुकीचा आहे, अशी टीका होतेय.

भारतीयफुटबॉल संघाने AFC Asian Cup 2023 स्पर्धेची पात्रता निश्चित केली. पण, पुढील वाटचालीसाठी भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्याऐवजी भारतीय फुटबॉल महासंघाने ( All India Football Federation ) चक्क ज्योतिषांची नेमणूक केली आणि त्यासाठी 16 लाख रुपये मोजल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी योग्य प्रयत्न करण्याबदल्यात AIFF कडून भारतीय संघाला मदत मिळावी यासाठी ज्योतिष कंपनी निवडण्यात आली.  

होय हे खरं आहे... भारतीय संघाला प्रेरणा देण्यासाठी AIFF ने ज्योतिषांची नियुक्ती केली आहे. आशिया चषक स्पर्धेत खेळाडूंना प्रेरणा मिळत रहावी यासाठी मोटीव्हेटर नियुक्त केले होते. पण, नंतर कळालं की ती एक ज्योतिष कंपनी आहे. त्यासाठी 16 लाख रुपयांचं पेयमेंट करण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले. याबाबत AIFFचे सरचिटणनीस सुनांदो दास यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया मिळू शकली नाही. 

भारताचा माजी गोलरक्षक तनुमोय बोस याने जोरदार टीका केली. युवा खेळाडूंसाठी लीग घेण्यात असमर्थ ठरणाऱ्या AIFF कडून पैशांचा असा दुरूपयोग चुकीचा आहे. हा प्रकार भारतीय फुटबॉलची प्रतिमा मलिन करणारा आहे, असे तनुमोयने सांगतिले. भारतीय संघाने हाँगकाँगवर 4-0 असा विजय मिळवून  AFC Asian Cup 2023 ची पात्रता निश्चित केली. ड गटात भारताने अव्वल स्थान पटकावले आहे. भारतीय संघ प्रथमच सलग दुसऱ्यांदा आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. याआधी भारतीय संघ 1964, 1984, 2011, 2019 मध्ये पात्र ठरला होता. 

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारतAstrologyफलज्योतिष