शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

वर्ल्डकपसाठी रशियात १० हजार भारतीय चाहते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 6:59 AM

 रशियात होत असलेल्या या फुटबॉल वर्ल्डकपसाठी तब्बल १० हजार भारतीय चाहते दाखल झाले आहेत. काही मराठी, काही उत्तर भारतीय तर काही दक्षिण भारतीयही येथे वर्ल्डकपचा थरार याची देही याची डोळा पाहणार आहेत.

विशेष प्रतिनिधीमॉस्को -  रशियात होत असलेल्या या फुटबॉल वर्ल्डकपसाठी तब्बल १० हजार भारतीय चाहते दाखल झाले आहेत. काही मराठी, काही उत्तर भारतीय तर काही दक्षिण भारतीयही येथे वर्ल्डकपचा थरार याची देही याची डोळा पाहणार आहेत.डोळ्याची पापणी लवेपर्यंत अचानक होणारा गोल, वाऱ्याच्या वेगानं होणारी चपळाई, नृत्यकाराला लाजवेल असे फुटबॉलच्या भोवती थुईथुई फिरणारे पाय, त्याचवेळी ताकद अन् टॅक्टिक्सच्या बळावर प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याची जिद्द अशा साºयांचा संगम असलेल्या फुटबॉल महाकुंभमेळ्याचा रशियात गुरुवारी बिगुल वाजला.लुझनिकी स्टेडियमवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादमिर पुतीन यांनी उद्घाटन केल्यानंतर रशिया विरुद्ध सौदी अरेबिया यांच्यातील पहिल्या सामन्याने स्पर्धेचा श्रीगणेशा झाला. आता पुढील एक महिना ३२ संघ २१वा फिफा वर्ल्डकप जिंकण्यासाठी जिवाचे रान करणार आहेत.आम्ही किमान खेळतोय, तुम्हा भारतीयांचे काय?सौदी अरेबियाच्या चाहत्याला मी विचारले, तुम्हाला कसे वाटतेय? तो म्हणाला, फिफाच्या मैदानात खेळायला मिळतेय, याचे आम्हाला समाधान आहे. पहिला सामना हरलो. हरकत नाही. किमान आम्ही खेळतोय तरी. भारतीयांचे काय? उत्तर ऐकून मी स्तब्ध झालो.यूपीएल हा एकमेव भारतीय समूह होता ज्यांच्यासाठी खास स्टेडियममध्ये बॉक्स होता आणि त्यात २५ खास चाहतेही होते. हिरोहोंडाचे मुंजालही तीनशे चाहत्यांसोबत उपस्थित होते.70 हजार प्रेक्षकांनी पहिला सामना याची देही याची डोळा पाहिला.फुटबॉलचा हा थरार पाहण्यासाठी मेक्सिकोमधून तब्बल दीड लाख चाहते रशियात दाखल झाले आहेत.13,525 रुपये किमतीचा (२०० डॉलर) फुटबॉल प्रत्येक गेमसाठी वापरला जाणार. हा फुटबॉल यूपीएल कंपनीने तयार केला असून, तो अतिशय कडक आहे. तो फुटबॉल आम्हाला खेळाआधी हाताळता आला, हे विशेष.पुतीन यांचा एकही फोटो नाही!एकहाती देश चालवणारे राष्ट्राध्यक्ष ब्लादमिर पुतीन यांचा फुटबॉल फिवरदरम्यान साधा एक फोटोही कुठे दिसून आला नाही. कुठेही त्यांच्या फोटोचे बॅनर आढळले नाही. स्वत:ला महत्त्व न देता पुतीन यांनी फुटबॉल या खेळाला आणि फुटबाल चाहत्यांना अधिकाधिक महत्त्व दिल्याचे जागोजागी दिसून येत होते. उद्घाटनानंतर पुतीन जिथे सामना पाहण्यास बसले होते, त्याच्याशेजारीच आमचा बॉक्स होता. त्यामुळे त्यांच्या चेहºयावरील हावभाव पाहता येत होते.रशियन शिकले इंग्लिश : फुटबॉल वर्ल्डकप पाहण्यासाठी येणाºया पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी रशियन लोकही इंग्लिश शिकले आहेत. स्थानिकांनी गेले काही महिने खास यासाठी प्रशिक्षण घेतल्याचे सांगितले. ते आमच्याशी अस्खलित इंग्रजी बोलत होते.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलrussiaरशियाIndiaभारत