शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

World Milk Day: दुधासोबत चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 09:56 IST

दूध आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण काही पदार्थ आणि दूध एकक्ष सेवन केल्यास त्याचे अनेक साइड इफेक्टही होतात.

दूध आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण काही पदार्थ आणि दूध एकक्ष सेवन केल्यास त्याचे अनेक साइड इफेक्टही होतात. आयुर्वेदानुसार, काही पदार्थ एकत्र सेवन केल्याने पचनक्रियासंबंधी समस्या, वजन वाढणं आणि त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात. उडीद डाळ आणि दूध दोन्ही गोष्टी पचनास वेळ घेतात. त्यामुळे या दोन्ही एकत्र सेवन केल्याने गॅसची समस्या होऊ शकते. त्यासोबतच असे अनेक पदार्थ आहेत, जे दुधासोबत सेवन करणे महागात पडू शकतं.

चटपटीत किंवा चिप्स

दुधासोबत चिप्स आणि चटपटीत पदार्थ खाणे टाळा. मिठामुळे दुधात असलेल्या प्रोटीनचा पूर्ण फायदा मिळू शकत नाही. तसेच असे केल्याने त्वचेशी संबंधित समस्याही होऊ शकतात.

कांदा

तुम्ही जे खाताय त्यात कांदा असेल तर त्यासोबत किंवा ते खाऊन झाल्यावर दुधाचं सेवन करू नका. या कॉम्बिनेशनने खाज, एग्जिमा, शरीरावर लाल चट्टे अशा त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात.

तिखट

तिखट-मसालेदार पदार्थ खात असाल तर त्यासोबत दूध किंवा दुधापासून तयार पदार्थ खाणे टाळा. हे पदार्थ एकत्र खाल्ल्याने पोटदुखी, अ‍ॅसिडिटी, गॅस आणि उलटीची समस्या होऊ शकते.

मासे

मासे गरम असतात. तर दूध थंड असतं. या दोन्ही गोष्टी एकत्र सेवन केल्यास गॅस, अॅलर्जीची समस्या होऊ शकते.

दही

दूध आणि दह्यापासून तयार पदार्थ एकाचवेळी खाऊ नये. हे पदार्थ एकाचवेळी खाल्ल्याने अॅसिडिटी, गॅस, उलटी आणि अपचन यांसारख्या समस्या होतात.

लिंबू

लिंबू किंवा इतर दुसरे आंबट पदार्थ खाणार असाल तर पुढील एक तास दुधाचं सेवन करू नका. हे एकत्र खाल्ल्याने अॅसिडिटी, गॅसची समस्या होऊ शकते.

टॅग्स :milkदूधHealth Tipsहेल्थ टिप्स