शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
3
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
4
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
5
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
6
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
7
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
8
गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात
9
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
10
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
11
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
12
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
13
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
14
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
16
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
17
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
18
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
19
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
20
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."

महिलांनी आपल्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश अवश्य करावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 10:20 IST

महिला आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आणि सौंदर्य राखण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय करतात. त्यासाठी अनेक महिला योगाचा किंवा डाएटचा आधार घेतात.

(Image Creadit : istockphoto.com)

महिला आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आणि सौंदर्य राखण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय करतात. त्यासाठी अनेक महिला योगाचा किंवा डाएटचा आधार घेतात. अनेकदा कामाच्या ताणामुळे आरोग्याकडे लक्ष देणं शक्य होत नाही. त्यामुळे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं. परिणामी रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यामुळे अनेक महिलांना आजांराचा सामना करावा लागतो. काही महिला डाएट करण्याच्या प्रयत्नात खाणं कमी करतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. आरोग्य चांगलं राहण्यासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते. त्यामुळे हेल्दी डाएट खाणं गरजेचं असतं. जाणून घेऊयात अशा पदार्थांबाबत ज्यांचा डाएटमध्ये समावेश केल्यानं महिलांना आरोग्य चांगलं राखण्यास मदत होईल.

फळं -

फळांमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असून त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळण्यास मदत होते. त्यामुळे फळांचा ज्यूस पिणंही फायदेशीर ठरतं. फळांच्या सेवनाने डिहाड्रेशनचा त्रास दूर करण्यास मदत होते. फळामध्ये डाळिंब, सफरचंद, टरबूज यांसारख्या फळांचं सेवन करणं फायदेशी असतं. फळं रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासोबतच आजारांपासूनही बचाव करतात. 

हिरव्या पालेभाज्या -

हिरव्या पालेभाज्या महिलांसाठी फायदेशीर ठरतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिनसोबतच फायबर मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे शरीराला पोषक तत्व मुबलक प्रमाणात मिळतात. 

पाणी -

पाणी पिणं हे शरीरासाठी चांगलं असतं. शरीरामध्ये पाण्याची कमतरता असेल तर अनेक आजार जडण्याची शक्यता असते. पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासोबतच  वजन कमी करण्याचंही काम करतं. 

सलाड -

जेवण्याआधी टॉमेटो, काकडी यांसारख्या व्हिटॅमिन असणाऱ्या पदार्थांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. 

दूध आणि दूधापासून तयार केलेले पदार्थ -

दूध आणि दूधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचे सेवन केल्यानं भरपूर प्रमाणात पोषण आणि ऊर्जा मिळते. जास्त मलई नसलेल्या दूधाचा आहारात समावेश करावा. त्यामुळे पोषक तत्व मिळतात. त्याचसोबत वजन वाढण्याच्या समस्याही उद्भवत नाहीत. 

वेलची -

वेलचीचा उपयोग पदार्थाचा सुगंध वाढवण्यासाठी करण्यात येतो. याव्यतिरिक्त अनेक लोकं तोंडाला येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी वेलचीचा उपयोग करतात. पण वेलचीचा उपयोग रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठीही होतो. रोज एक वेलची खाल्याने इम्यूनिटी सिस्टीमही चांगली राहते. 

लसून -

रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी लसणाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. तसेच कॅन्ससारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठीही लसून फायदेशीर ठरतो. 

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्य