शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून जपानी खाद्यपदार्थ जगात सर्वाधिक आरोग्यदायी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 18:20 IST

जपानी माणसांच्या आरोग्यदायी आयुष्याचं रहस्य त्यांच्या खाद्यसंस्कृतीत दडलंय

मुंबई: जगभरातील माणसांचं सरासरी आयुमान 71 वर्षे आहे. मात्र जपानमधील व्यक्तींचं सरासरी आयुमान 83.7 वर्षे आहे. जपानी माणसांच्या आयुमानाचं रहस्य त्यांच्या खाद्य संस्कृतीत दडलं आहे. खाद्यपदार्थांकडे आरोग्यदायी दृष्टीकोनातून पाहिलं जावं, अशी शिकवण जपानी संस्कृतीत आहे. 'हारा हाची बू' असं जपानमध्ये म्हटलं जातं. याचा अर्थ पोट 80% भरेपर्यंत जेवावं, असा होता. विशेष म्हणजे परंपरेतून आलेली ही शिकवण मुलांना लहानपणीच दिली जाते. खाद्यपदार्थ समोरच्या व्यक्तीसमोर कसे ठेवले जातात, याला जपानमध्ये अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे जेवण वाढताना विशेष काळजी घेतली जाते. खाद्यपदार्थ एखाद्या व्यक्तीच्या समोर मांडताना त्याच्या ते डोळ्याला सुखावतील, हे पाहिलं जातं. खाद्यपदार्थ पोटात जाण्याआधी ते पाहूनच तुमची ज्ञानेंद्रियं जागृत होतील, याबद्दल जपानी मंडळी अतिशय दक्ष असतात. त्यामुळे हे पदार्थ खाताना फक्त पोट न भरता, त्याचा 'फिल' घेता येतो.  कॅलरी कशा कमी करायच्या याची चिंता सतावत असेल, तर जपानी खाद्यपदार्थ हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. कारण जपानमधील व्यक्तींच्या आहारात जगातील इतर माणसांच्या तुलनेत 25% कमी कॅलरी असतात. फ्लोरिडा विद्यापीठाच्या अभ्यासातून ही आकडेवारी समोर आली आहे. जपानी खाद्यपदार्थ लहान ताटांमध्ये आणि वाट्यांमध्ये वाढले जातात. यामुळेच जपानी माणसांचं आरोग्य जास्त चांगलं राहतं, असं आहारतज्ज्ञांचं मत आहे. ताटात जास्त जेवण वाढल्यावर अनेकदा ते संपवण्यासाठी माणसं जेवतात. याउलट जपानमध्ये गरजेइतकंच अन्न सेवन केलं जातं. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. याचा खूप मोठा फायदा आरोग्याला होतो.  

टॅग्स :Japanजपानfoodअन्नHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स