शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात ब्रोकलीची भाजी खाणे फायदेशीर का ठरते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 10:15 IST

उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे आणि तापत्या सूर्यामुळे होणाऱ्या उकाड्याने अनेक आरोग्यासंबंधी समस्याही सुरू होत आहेत.

उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे आणि तापत्या सूर्यामुळे होणाऱ्या उकाड्याने अनेक आरोग्यासंबंधी समस्याही सुरू होत आहेत. अशात आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. भारतात तर पूर्वीपासून भाज्यांचा आहारात समावेश करण्याचं चलन आहे. पण असेही काही लोक आहेत जे हिरव्या भाज्यांना आहारात महत्त्व देत नाहीत. उन्हाळ्यात आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काही खास भाज्यांचा आहारात समावेश करणं गरजेचं असतं. त्यातील एक भाजी म्हणजे ब्रोकली. उन्हाळ्यात ब्रोकलीचा आहारात समावेश केल्यावर शरीराला वेगवेगळे व्हिटॅमिन्स तर मिळतीलच सोबतच उन्हाळ्यात होणाऱ्या समस्यांपासूनही बचाव होतो. ब्रोकलीचा डेली डाएटमध्ये समावेश का करावा, यासाठी thehealthsite.com ने दिलेले ब्रोकलीचे होणारे फायदे जाणून घेणे गरजेचे आहे. 

ब्रोकलीमध्ये आढळणारे पोषक तत्त्व

ब्रोकली ही तशी फ्लॉवरची एख प्रजाती आहे. पण यात आढळणारे पोषक तत्त्व फार खास असतात. ब्रोकलीमध्ये फॅटचं प्रमाण फारच कमी असतं, त्यामुळे या भाजीकडे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर म्हणूनही पाहिलं जातं. ब्रोकलीमध्ये सोडियम, पोटॅशिअम, कार्बोहायड्रेट, फायबर, प्रोटीन, कॅल्शिअम, आयर्न आणि भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आढळतात.

वजन कमी करण्यासाठी ब्रोकली

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशिल आहात, तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ब्रोकलीचा समावेश आवर्जून केला पाहिजे. ब्रोकलीची भाजी खाल्ल्याने शरीराला आवश्यक ते पोषक तत्त्व मिळतात. तसेच जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाण्यापासूनही बचाव होतो. 

इम्यूनिटी आणि मेटाबॉलिज्म वाढवा

जर तुमची इम्यूनिटी कमजोर असेल तर मेटाबॉलिज्म सुद्धा कमजोर होऊ लागतं. ब्रोकलीच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळतं, याने शरीराची इम्यून सिस्टीम ठीक होते. इम्यून सिस्टीम ठीक असेल तर आपोआप मेटाबॉलिज्म सुद्धा मजबूत राहतं. 

अल्झायमर आणि डिमेंशियापासून बचाव

वाढत्या वयासोबत व्यक्तीला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यात एक मोठी समस्या म्हणजे स्मरणशक्ती कमजोर होणे. काही लोकांना अल्झायमर आणि डिमेंशियाचा देखील त्रास होऊ लागतो. जर तुम्हाला अल्झायमर किंवा डिमेंशियाच्या समस्येपासून दूर रहायचं असेल तर डाएटमध्ये ब्रोकलीचा समावेश करावा. 

कॅन्सरपासूनही होतो बचाव

अनेक शोधांमधून हे स्पष्ट झाले आहे की, जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ब्रोकलीच्या भाजीचा समावेश कराल तर तुम्ही कॅन्सरसारखा आजारा दूर ठेवू शकता. ब्रोकलीची भाजी खाल्ल्याने कोलन कॅन्सर आणि लंग कॅन्सरचा धोका कमी होतो, असे म्हटले जाते. 

उन्हाळ्यात ब्रोकलीची भाजी वरदान

उन्हाळ्यात सूर्यातून निघणाऱ्या यूवी रेडिएशनने शरीरावर फार वाईट परिणाम होतो. या रेडिएशनमुळे शरीराच्या अंगांवर सूज येऊ लागते. जर तुम्हाला गरमीमुळे होणाऱ्या त्रासापासून वाचायचं असेल तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ब्रोकलीचा समावेश करू शकता. 

हार्ट अटॅकचा धोकाही होतो कमी

डेली डाएटमध्ये जर तुम्ही ब्रोकलीची भाजी कशाही प्रकारे खात असाल तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचा धोकाही कमी असतो. ब्रोकलीच्या भाजीमध्ये आढळणारे पोषक तत्त्व तुमचं रक्त घट्ट होण्यापासून रोखते. ब्रोकलीमध्ये आढळणारं कॅरेटेनॉयड्स ल्यूटिन आणि पोटॅशिअम कोलेस्ट्रॉलचा स्तरही नियंत्रणात ठेवतात. 

निरोगी त्वचेसाठी ब्रोकली

जर तुम्हाला तुमची त्वचा नेहमी तरूण आणि टवटवीत ठेवायची असेल तर डाएटमध्ये ब्रोकलीच्या भाजीचा समावेश करा. कारण ब्रोकलीमध्ये आढळणारे अॅंटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी त्वचेला पोषण देण्याचं काम करतात.  

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्स