शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

विविध चवींची पाणीपुरी तीही घरच्याघरी!

By admin | Updated: April 27, 2017 18:00 IST

मुलांना अतिशय आवडणाऱ्या पाणीपुरीला हेल्थी टच देवून पाणीपुरीची मुलांची हौस घरच्याघरी भागवता येते.

सारिका पूरकर-गुजराथीमुलांना सुट्टी लागल्यामुळे घराघरांमध्ये नुसता दंगा मस्ती आणि कल्लोळ असेल. दर तासा दोन तासांनी आई आम्हाला अमुक हवं अशा फर्माइशी असतील. जे हवं ते यम्मी आणि चटपटीतच असायला हवं हा सर्वच मुलांचा हट्ट. आता मुलांना चटपटीत आवडतं म्हणून त्यांना सारखी बाहेरची पाणीपुरी, भेळपुरी, पॅटिस देवून कसं चालेल. पण खरंतर मुलांना अतिशय आवडणाऱ्या पाणीपुरीला हेल्थी टच देवून पाणीपुरीची मुलांची हौस घरच्याघरी भागवता येते.

* फ्रूटी पाणीपुरीसध्या बाजारात कलिंगड, संत्री द्राक्षं अन डाळिंबं भरपूर आली आहेत. एका भांडयात थोडा कलिंगडाचा, संत्र्याचा आणि द्राक्षांचा ज्यूस घ्या. त्यात थोडी साखर, काळेमीठ, मिरीपावडर, चाट मसाला, पाणीपुरी मसाला अन कोथिंबीर घाला. ते थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा. नंतर पाणीपुरीच्या पुरीत हे फळांचं पाणी भरा. त्यात चण्यांऐवजी डाळिंबाचे दाणे घाला. वरुन बारीक शेव भुरभुरा. सफरचंदाच्या, आंब्याच्या फोडीही तुम्ही घालू शकता. एकदम हेल्दी फ्रूट पाणीपुरी तय्यार. एरवी फ्रूट्स म्हटले की मुलं नाकं मुरडतात. फ्रूटी पाणीपुरी हा त्यावरचा रामबाण उपाय आहे.

 

 

* प्रोटिन पाणीपुरी

सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्यांमध्ये प्रोटिन्स भरपूर असतात. त्यामुळे या डाळी शिजवल्यानंतर त्यांचं पाणी, चाट मसाला, पाणीपुरी मसाला,जिर-मिरे घालूनही पाणीपुरी बनवता येईल. पुरीमध्ये मोड आलेली कडधान्यं आणि नंतर हे पाणी घालून झकास प्रोटीन पाणीपुरी बनेल. कडधान्यांचं पाणीही पाणीपुरीसाठी वापरता येतं.

* बटरमिल्क पाणीपुरी सध्या ऊन मी मी म्हणतय. ताक हे तर उन्हाळ्यात अमृतासमान असतं. याच ताकाचा वापर पाणीपुरीसाठी करता येईल. ताकात जिरे, काळं मीठ, पुदिना, कोथिंबीर, थोडंसं आलं घालून पातळसर मिश्रण बनवा. ते गार करा. पुरीत भरताना खारी बुंदी आणि ताकाचं मिश्रण घाला.ही पाणीपुरीही एकदम बेस्ट लागते.* आंबटगोड पाणीपुरी आंब्याची झाडं कैऱ्यांनी लगडलेली दिसताहेत सध्या. घरोघरी कैरीचं पन्हं, कैरी डाळ याचा बेत असतोच. याच पन्ह्याचा उपयोग पाणीपुरीसाठीही करता येतो. पन्ह्यात भाजलेल्या जिऱ्या-मिऱ्याची पावडर अन कोथिंबीर मात्र अवश्य घालावी. पन्ह्यासाठी शक्यतो गूळ वापरा. उन्हाळ्यात गूळ किती गुणकारी आहे, हे माहितच आहे ना ! कैरीप्रमाणेच चिंचेचं पन्हंही पाणीपुरीसाठी वापरु शकता.* गार्लिक पाणीपुरीपाणीपुरीलाही थोडा मसाल्याचा तडका हवाच ना! त्यासाठी लसणाच्या पाच-सात पाकळ्या, लाल तिखट, काळं मीठ, पाव चमचा सायट्रिक अ‍ॅसिड, चवीनुसार साखर एकत्र घालून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करावी. यात भरपूर थंडगार पाणी मिसळून ते पाणी पुरीत घालून खाता येतं. ही पाणीपुरीही टेस्टी लागते.