शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

यंदाच्या पावसाळ्यात भज्यांचे हे 7 प्रकार ट्राय करून बघा. पावसासोबतच ही भजीही तुम्हाला त्यांच्या प्रेमात पाडतील!

By admin | Updated: June 8, 2017 18:04 IST

पावसाळा, चहा आणि भजी हे समीकरण पुढील अरबो नाही तर खरबो वर्षं तरी कोणीही बदलू शकणार नाही. पण एक आहे भजीचे प्रकार आपण नक्कीच बदलू शकतो

- सारिका पूरकर -गुजराथी

मान्सूनपूर्व पावसानं सर्वत्र हजेरी लावलीय. लवकरच मान्सूनही बरसणार आहे. धो-धो, मुसळधार, रिमझिम अशा सर्वच रुपात तो बरसणार आहे. रवीराजाच्या प्रकोपामुळे अंगाची काहिली होत असताना या पावसाने सारे काही थंडगार, आल्हाददायक होऊन जाणार आहे. करपलेल्या रोपांऐवजी हिरवीगार, वाऱ्यावर डोलणारी रोपे, शेते दिसू लागणार आहे. अवघी सृष्टीच पाऊस पिऊन ताजीतवानी होऊन जाणार आहे. गवताच्या पात्यांवर, अळवाच्या पानांवर, पक्ष्यांच्या पंखांवर, सिमेंटच्या पत्र्यांवर, मातीच्या कौलांवर हा पाऊस थुईथुई नाचणार आहे. मग तना-मनाला बेधुंद करणाऱ्या अशा पावसात खिडकीत बसून पाऊस न्याहाळताना हातात वाफाळता आलं घातलेल्या चहाचा कप आणि जोडीला गरमागरम, कुरकुरीत, खुसखुशीत भज्यांची प्लेट  ती तर हवीच! पावसाळा, चहा आणि भजी हे समीकरण पुढील अरबो नाही तर खरबो वर्षं तरी कोणीही बदलू शकणार नाही. पण एक आहे भजीचे प्रकार आपण नक्कीच बदलू शकतो आणि पाऊस आणि भजी हे समीकरण आणखी इंटरेस्टिंग करू शकतो.

 

                   

१) पीनट पकोडा

शेंगदाणेची भजी असं याचं सोपं रुप. खारे, मसाला शेंगदाणे तुम्ही नेहमी खात असाल पण शेंगदाण्याची भजी कधी ट्राय केलीय का? बेसन, कॉर्नफ्लोअर,हिंग, मीठ, शेंगदाणे, तिखट असं सारं एकत्र करुन पाण्यात भजींसाठी भिजवतो तसं पीठ भिजवायचं आणि गरम तेलात मंद आचेवर भजी काढायची. पीठ खूप पातळ नको. खरपूस तळलेली शेंगदाणा भजी एकेक करुन केव्हा फस्त होतील ते कळणार सुध्दा नाही. बेसनाऐवजी नागलीचं पीठ वापरुन ही भजी आणखी पौष्टिक बनवू शकता, त्यात लसूण ठेचून घातला तर ती आणखीनच चविष्ट लागतात.

२) राम लड्डू

नाव ऐकून लाडूचा एखादा नवीन प्रकार वाटतोय ना? पण तसं नाहीये. हा प्रकार भज्यांचाच आहे. दिल्लीतील खूप लोकप्रिय पदार्थ आहे हा. मूगडाळ, चणाडाळ रात्रभर भिजवून नंतर पूर्ण निथळून घेतली जाते. नंतर त्यात मीठ, हिरवी मिरची, आलं घालून रवाळ वाटून घेतलं जातं. या मिश्रणाला भरपूर फेसून त्याचे लाडूच्या आकाराचे भजे तळले जातात. नंतर हे भजे हिरवी चटणी, मुळ्याचा किसाबरोबरसर्व्ह केले जातात. दिल्लीत हा प्रकार चाट म्हणूनही आवडीनं खाल्ला जातो.

 

   

३) बटाट्याची खेकडा भजी

एरवी खेकडा भजी म्हणजे कांद्याचीच. पण ही खेकडा भजी बटाट्याचीही होतात. बटाटे सोलून जाड किसणीवर किसून घ्या. किस मोकळा आणि जाड व्हायला हवा. तो चांगला धुवून घ्या. निथळून घ्या. या किसात मीठ, तिखट,जिरे, धनेपुड, ओवा घाला. पाणी सुटलं की त्यात मावेल एवढंच बेसन घाला. थोडं कॉर्नफ्लोअर घातलं तरी चालेल. मिश्रण हातानं भजी सोडता येतील इतपत घट्ट हवं. ही खेकडा भजी मंद आचेवर पण तेलात खरपूस तळा आणि सॉसबरोबर गरमच खा. नक्कीच वेगळी चव मिळेल.

४) भाताचे भजे

शिळा भात उरला की हमखास फोडणीचा भात म्हणून सर्व्ह केला जातो. मात्र त्याच शिळ्या भातापासून खमंग भजीही बनवता येतील. भातात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, जिरे, तिखट, ओवा, मीठ, आले, हिंग घाला. नंतर बेसन घालून भज्यांसारखे पीठ भिजवा. मध्यम आकाराची भजी काढून वेगळ्या चवीची भजी सर्व्ह करा. एकदम कुरकुरीत लागतात.

५) कच्च्या केळीची भजी

कच्ची केळी सोलून त्याचे गोलाकार किंवा लांबट, मध्यम जाडीचे तुकडे, स्लाईस करुन घ्या. नंतर बेसन, थोडं तांदळाचं पीठ, मीठ, तिखट, हिंग, खाण्याचा सोडा, कोथिंबीर घालून मिश्रण बनवा. केळीचे काप यात घोळवून तेलात तळून घ्या. ही भजी पावसाची मजा दुप्पट करतील हे नक्की!

६) चायनीज भजी

चायनीज पदार्थांची भुरळ आपल्या सर्वांना पडलीच आहे. मग भजी हा अस्सल भारतीय पदार्थही चायनीज चवीपासून दूर कसा राहील, भज्यांनाही सध्या चायनीज टच दिला जातोय . तुम्हीही करा या पावसाळ्यात ही चायनीज भजी. रेडिमेड नूडल्स पाकिटावरील सुचनेनूसार शिजवून गार करा. बेसन, तांदळाचं पीठ, कोथिंबीर, आलं-लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ, खाण्याचा सोडा, हळद आणि तिखट एकत्र करुन पाणी घालून भिजवा.नूडल्स घालून भजी घाला आणि सोनेरी रंगावर तळा. मिश्रण खूप पातळ नको. चायनीज तडका द्यायचा असल्यास सोया सॉसबरोबर सर्व्ह करा. नूडल्सचे तार मोकळे दिसायला हवे असतील तर पीठ घट्ट भिजवा. यात मशरुम, पत्ता कोबी घालून या भज्यांना पौष्टिकतेची जोडही देता येते.

 

         

७) शेपूची भजी

एरवी पालकाची भजी आपण नेहमीच खातो. परंतु, शेपूच्या भाजीची भजी करता येतात. हे माहितही नसेल अनेकांना. हा भज्यांचा प्रकार गुजराती बांधवांमध्ये आवडीनं खाल्ला जातो. बेसन, तांदळाचे पीठ, तीळ, गरम मसाला, बडीशेपची पावडर,धन-जिरे पावडर, मीठ, हळद-तिखट, बारीक चिरलेला कांदा आणि शेपूची चिरलेली भाजी घालून हे मिश्रण बनवतात आणि भजी काढली जातात. वेगळ्या चवीची आणि काहीशी दुर्लक्षित, नाकं मुरडल्या जाणाऱ्या शेपूला आपलंसं करायला लावणारी ही भजी आहेत. या जोडीला स्वीट कॉर्न-चीज, गोभी, भेंडी, कारले अशा विविध भाज्या वापरून तसेच ज्वारी, गव्हाचं पीठ वापरुनही अनेक पौष्टिक भज्यांची चव घरबसल्या चाखता येऊ शकते. यंदा बरसणाऱ्या प्रत्येक पावसात ही वेगवेगळी भजी नक्की ट्राय करून बघा!