ही रेसिपी ट्राय करा; कारल्याला बघताच तोंडाला सुटेल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 08:59 PM2021-05-27T20:59:35+5:302021-05-27T21:00:55+5:30

आम्ही तुम्हाला कारल्याची अशी रेसिपी सांगणार आहोत जी पाहताच तुम्ही तुमची बोटं चाटत राहाल. कारलं हे पूर्ण कडू असतं हे तुम्ही सपशेल विसरून जाल.

Try this recipe; Water will come out of your mouth as soon as you see bitter gourd | ही रेसिपी ट्राय करा; कारल्याला बघताच तोंडाला सुटेल पाणी

ही रेसिपी ट्राय करा; कारल्याला बघताच तोंडाला सुटेल पाणी

Next

कारलं बघताच अनेकांची तोंड वाकडी होतात. कारल्याची भाजी सर्वांना नकोशी होऊन जाते. त्याचा कडवटपणा कोणालाच सहन होत नाही. पण आम्ही तुम्हाला कारल्याची अशी रेसिपी सांगणार आहोत जी पाहताच तुम्ही तुमची बोटं चाटत राहाल. कारलं हे पूर्ण कडू असतं हे तुम्ही सपशेल विसरून जाल.

कशी कराल कारल्याची ही नवी रेसिपी?

साहित्य
कारलं-२५० ग्रॅम
कांदे- ७ ते ८
हळद-दिड चमचा
धने पावडर- १ चमचा
आमचूर्ण-अर्धा चमचा
लाल तिखट-पाव चमचा
मीठ-चवीनुसार
तेल-तीन मोठे चमचे
वाटून बारीक केलेली बडिशेप-दोन मोठे चमचे

कृती
प्रथम कारलं सोलून घ्या. त्याचे गोलाकार तुकडे करा. ते मिठाच्या पाण्यात किमान अर्धातास भिजवून ठेवा आणि त्यातील पाणी काढून टाका. असं केल्याने कारल्याचा कडवटपणा बराच कमी होतो. त्यानंतर कांदे उभे चिरून घ्या. कढईमध्ये तेल गरम करा. त्यात कांदे भाजून घ्या. कांदे लालसर होईपर्यंत भाजण्याची गरज नाही. मंद आचेवर थोडेच भाजून घ्या. त्यानंतर त्यात कारले टाका. व्यवस्थित परतून घ्या. त्यात हळद, लाल मिर्ची पावडर, धन्याची पावडर, बारीक वाटलेली बडीशेप टाका. भाजीवर झाकण ठेऊन मंद आचेवर शिजू द्या. आता भाजीवरचे झाकण काढा आणि त्यात आमचूर पावडर टाका. भाजी लाल होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्या. काळजी घ्या भाजी करपू नये. नंतर भाजी गरम गरम चपाती किंवा पराठ्यासोबत खायला द्या. 
 

Web Title: Try this recipe; Water will come out of your mouth as soon as you see bitter gourd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.