पॅनकेक म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे गोड पदार्थ पण तुम्हाला गोड खाऊन कंटाळा आला असेल तर हा चिझी पोटॅटो पॅनकेक ट्राय करायलाच हवा. हा असा काही लज्जतदार लागतो की त्यासमोर तुम्ही सर्व विसरून जाल. तुमच्या बच्चेकंपनीला आवडेल तो वेगळाच...
साहित्य२ कप बटाटा किसलेला१ वाटी मैदा१ टिस्पून मिरे पावडर१ कप किसलेले चीजचवीपुरते मीठ
कृतीसर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात किसलेला बटाटा, चीज आणि मैदा सगळं मिक्स करून घ्या.वाटलेला या मिश्रणात मिरे पुड आणि मीठ टाकून एकत्र करून घ्याएका पॅनमध्ये तेल टाका. त्यावर हे मिश्रण हलकेच टाका. हळूहळू गोलाकार दाबून घ्या.दोन्ही बाजूंनी गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यागरमा गरम आलु पॅन केक तयार. सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करा.