शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

एक असं खास सूप जे तुमचं वजनही कमी करेल आणि तुम्हाला हेल्दीही ठेवेल, जाणून घ्या रेसिपी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 16:09 IST

Vegetable Oats Soup : सूप हे एक खूप हेल्दी फूड आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या सूपचं सेवन करून तुम्ही वजनही कमी करू शकता आणि आरोग्यही चांगलं ठेवू शकता.

Vegetable Oats Soup : जे लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात ते लोक एक्सरसाईज करण्यासोबतच हेल्दी डाएट घेण्यावरही भर देतात. अशात लोक वेगवेगळ्या हेल्दी गोष्टींचं सेवन करतात. एक्सरसाईजसोबतच हेल्दी डाएटशिवाय तुम्ही वजन कमीच करू शकत नाही. अनेकदा लोक हेल्दी फूडच्या नावाखाली टेस्ट नसलेले पदार्थ खातात आणि कंटाळून जातात. कंटाळा आला की, लोक वजन कमी करण्याचा नादही सोडतात. 

सूप हे एक खूप हेल्दी फूड आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या सूपचं सेवन करून तुम्ही वजनही कमी करू शकता आणि आरोग्यही चांगलं ठेवू शकता. सूपचे फायदे असे आहेत की, एकतर ते लवकर तयार होतं आणि यात तुम्ही वेगवेगळ्या हेल्दी गोष्टी टाकू शकता. याने शरीराला भरपूर पोषक तत्वही मिळतात आणि तुम्हाला वेगळी टेस्टही मिळते. व्हेजिटेबल ओट्स सूप असंच एक हेल्दी सूप आहे. याचीच रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

व्हेजिटेबल ओट्स सूप रेसिपी साहित्य

ऑलिव ऑईल- 1 टेबलस्पून

लसूण - 1 टीस्पून

आले - 1 टीस्पून, 

सेलेरी - 1 टीस्पून,

कोथिंबिर - 1 टीस्पून

कांदा - 1/4 कप

ओट्स- 1/4 कप, 

काही भाज्या - मशरूम, बीन्स, पत्ता कोबी, गाजर एक कप

व्हेजिटेबल स्टॉक- 2 कप

मीठ - टेस्टनुसार

काळी मिरी - 1/2 टीस्पून

कसं बनवाल?

एक पॅन गॅसवर गरम करा. पॅन गरम झाल्यावर त्यात तेल टाका. तेलात लसूण, आले, कांदा आणि कोथिंबिर टाकून हलकं भाजा. नंतर यात ओट्स टाकून काही वेळ भाजा. त्यानंतर यात कापलेल्या भाज्या टाका. नंतर यात व्हेजिटेबल स्टॉक, मीठ, काळी मिरी आणि राहिलेला कोथिंबिर, थोडं पाणी टाकून 15 ते 20 मिनिटे होऊ द्या. तयार आहे तुमचं खास सूप. या सूपने वजन कमी होण्यास मदत तर मिळतेच सोबतच याने सर्दी-खोकला अशा समस्याही दूर होतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य