शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

Food: मुघल रसोईतील काजू कतलीचं रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 5:31 AM

Food: सोळाव्या-सतराव्या शतकात गोव्यात, केरळात काजूच्या बागा फुलल्या. लवकरच काजू निर्यातदेखील होऊ लागला. त्या काळात दिल्लीची सत्ता होती मुघलांकडे. पोर्तुगीज आणि दिल्लीकरांचे व्यापारी संबंध बऱ्यापैकी सलोख्याचे असल्याने काजू दिल्ली दरबारात जाऊन पोहोचला असावा.

- मेघना सामंत, (लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

सोळाव्या-सतराव्या शतकात गोव्यात, केरळात काजूच्या बागा फुलल्या. लवकरच काजू निर्यातदेखील होऊ लागला. त्या काळात दिल्लीची सत्ता होती मुघलांकडे. पोर्तुगीज आणि दिल्लीकरांचे व्यापारी संबंध बऱ्यापैकी सलोख्याचे असल्याने काजू दिल्ली दरबारात जाऊन पोहोचला असावा. तिथे अफगाणिस्तान, इराण इथून आणवलेले बदाम, पिस्ते मौजूद होतेच. त्यांना साथ देण्यासाठी काजूहून योग्य दुसरं कोण मिळणार? तर... मुघलाईतल्या काजूची एक रंजक कहाणी सांगतात. अकबर बादशहाचा मुलगा जहांगीर (म्हणजेच अनारकलीचा सलीम) सत्तेवर असताना त्याचा शिखांचे गुरु हरगोबिंदसिंगजी यांच्यावर रोष झाला. त्याने त्यांना ग्वाल्हेर इथल्या किल्ल्यात डांबून ठेवलं. त्याच किल्ल्यात भारतातल्या ५२ छोट्याछोट्या राज्यांचे राजेही कैदेत ठेवले होते. जेमतेम बारा-चौदा वर्षांच्या हरगोबिंदसिंगजी यांनी त्या राजांना एकत्र आणलं, त्यांचं प्रबोधन केलं. त्यांच्यासोबत किल्ल्यात झाडं लावली, त्यांचं मन गुंतून राहील अशी कामं केली. पुढे जहांगीर बादशहा गुरुजींचं आदर्श कार्य बघून प्रभावित झाला आणि त्याने त्यांना सोडायचं ठरवलं. पण, हरगोबिंदसिंगांनी आपल्यासोबत अटकेत असलेल्या सगळ्या राजांनाही सोडून द्यायचा आग्रह धरला. तेव्हा जहांगीरने त्यांना एक विचित्र अट घातली. “तुम्ही स्वतः किल्ल्याच्या बाहेर पडत असताना तुम्हाला चिकटून जितकी माणसं येऊ शकतील, तितक्यांना बाहेर सोडलं जाईल!”- गुरुजीही कल्पक. त्यांनी भरपूर लांबीचा अंगरखा आणि त्याला सगळीकडून लांबलचक दोऱ्यांची झालर पक्की शिवून घेतली. हरगोबिंदसिंगजी जेव्हा किल्ल्याच्या बाहेर निघाले तेव्हा त्यांच्या अंगरख्याच्या एकेका दोऱ्याला लटकून सगळे बावन्न राजे एकदमच बाहेर पडले. सर्वांची सुटका झाली. आता यात काजूचा काय संबंध? तर चकित झालेल्या जहांगीर बादशहाने गुरुजींच्या सन्मानार्थ मेजवानी ठेवली. तेव्हा शाही खानसाम्याने एक मिठाई खास घडवली... तीच काजू कतली (किंवा कतरी). चौकट आकाराची, मोतिया वर्णाची, चांदीचा वर्ख ल्यालेली, मोहमयी काजू कतली. काजू गोव्यात पिकत असले तरी काजू कतली तिथली नव्हे. काजूला शाही रूपात पेश करण्याचं श्रेय मुघलांच्या रसोईयाचं. (askwhy.meghana@gmail.com)

टॅग्स :foodअन्न