शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्तात मस्त आणि चवीला जबरदस्त ; असे बनवा भन्नाट मँगो आईस्क्रीम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 17:42 IST

घरच्या घरी करायला सोपे आणि चवीला भन्नाट अशा मँगो अर्थात आंब्याच्या आईस्क्रीमची रेसिपी आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो आहोत. तेव्हा हे आईस्क्रीम करा आणि उन्हाळा अधिक गोड बनवा. 

पुणे : रणरणत्या उन्हात आईस्क्रीम खायची इच्छा तर सगळ्यांना होते. पण अनेकदा त्यामुळे त्रास होण्याचे प्रसंगही उद्भताना दिसून आले आहेत. विशेषतः आईस्क्रीम जुने आणि निकृष्ट दर्जाच्या पदार्थांपासून बनवले असेल तर उलट्या, जुलाब, मळमळ, घसा बसणे अशी अनेक दुखणी उद्भवतात. पण आता त्याची चिंता नको. कारण घरच्या घरी करायला सोपे आणि चवीला भन्नाट अशा मँगो अर्थात आंब्याच्या आईस्क्रीमची रेसिपी आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो आहोत. तेव्हा हे आईस्क्रीम करा आणि उन्हाळा अधिक गोड बनवा. 

साहित्य :

  •  एक कप आंब्याचा रस ( रस हापूसचाच हवा असं काही नाही, फक्त  घट्ट हवा. )
  • एक कप मिल्क पावडर,
  •  एक कप दूध (निरसं म्हणजेच न तापवलेलं )
  • एक कप साय (बाजारात मिळणारं क्रीमही वापरू शकता. 
  • तीन ते चार टेबलस्पून पीठीसाखर, 
  • वाटीभर आंब्याच्या बारीक फोडी 

 

  • कृती -
  • आंब्याच्या बारीक फोडी वगळता सगळे पदार्थ  मिक्सरला फिरवून एकजीव करून घ्या. 
  • आइस्क्रीम किती गोड हवं त्यानुसार पीठीसाखर घाला.
  •  तयार झालेलं घट्टसर द्रावण प्लॅस्टिकच्या पसरट डब्यात ओतून घ्या. 
  • डब्याचं झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवा. झाकण असणं आवश्यक आहे.
  • पहिल्यांदा आइस्क्रीम सेट करताना फ्रीजरचा थंडावा मॅक्सिममवर ठेवा. आइस्क्रीम सेट झालं की, थोडा वेळ बाहेर काढून ठेवा. ते थोडं वितळू द्या. मग त्याचे चमच्याने तुकडे करा आणि ते अर्धवट वितळलेलं आइस्क्रीम स्मूथ होईस्तोवर मिक्सरमधून फिरवून घ्या.  यामुळे आइस्क्रीममधे तयार झालेले क्रिस्टल मोडून पडतात. 
  • पुन्हा सेट करण्यासाठी कंटेनरमध्ये ओता. त्यात आंब्याच्या बारीक फोडी नीट मिसळा. आता आइस्क्रीम पुन्हा सेट करण्यासाठी ठेवताना मात्र फ्रीजरचा थंडावा मॅक्सिममवर ठेवू नका, तर त्यापेक्षा थोडा कमीवर ठेवा, ज्यामुळे स्मूथ टेक्श्चर न बिघडता आइस्क्रीम सेट होतं. 
  • आणि एन्जॉय करा मँगो आईस्क्रिम.
टॅग्स :ReceipeपाककृतीMangoआंबा