शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

हेल्दी आणि टेस्टी पालक पराठा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 16:26 IST

आपण अनेकदा काहीतरी हटके पदार्थ तयार करण्याच्या विचारात असतो. अशावेळी तुम्ही पराठा ट्राय करू शकता. त्यामध्ये प्रामुख्याने बटाट्याचा पराठा, कोबीचा पराठा यांचा समावेश होतो.

आपण अनेकदा काहीतरी हटके पदार्थ तयार करण्याच्या विचारात असतो. अशावेळी तुम्ही पराठा ट्राय करू शकता. त्यामध्ये प्रामुख्याने बटाट्याचा पराठा, कोबीचा पराठा यांचा समावेश होतो. पण तुम्ही कधी पालक पराठा तयार केला आहे का? पालक पराठा हा घरच्या घरी अगदी सहज तयार करता येणारा पदार्थ असून एक इंडियन ब्रेकफास्ट रेसिपी आहे. जो पालकची भाजी आणि काही मसाले एकत्र करून तयार करण्यात येतो. पालकमध्ये आयर्न, झिंक मुबलक प्रमाणात आढळून येतं. ज्यामुळे हा पराठा टेस्टी असण्यासोबतच हेल्दीही असतो. हा पराठा तयार करण्यासाठी फार वेळ लागत नाही. हा हेल्दी नॉर्थ इंडियन पदार्थ स्कूल टिफिन, रोडट्रिप आणि पिकनिकसाठी तयार करू शकता. 

साहित्य :

  • 1 कप गव्हाचं पिठ
  • 1/4 टीस्पून हळदीची पावडर 
  • मीठ चवीनुसार
  • ½ टीस्पून ओवा
  • 1 बारीक चिरलेला कांदा
  • ¾ कप बारिक चिरलेली पालक
  • 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर 
  • 1 टीस्पून जीरं
  • 1 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या 
  • 2 टेबलस्पून बटर

 

कृती :

- पालक पराठा एक सहज तयार करता येणारी रेसिपी आहे. त्यासाठी सर्वात आधी पालक धुवून घ्या. त्यानंतर त्यातील एक्स्ट्रा पाणी काढून टाका. 

- जर तुम्ही हे आणखी हेल्दी आणि पचण्यास हलकी असणारा पदार्थ म्हणून तयार करणार असाल तर सर्वात आधी पालक उकळून घ्या. त्यानंतर पाणी गाळून बाजूला ठेवा. मिश्रण एकजीव करण्यासाठी याच पाण्याचा वापर करा. त्यामुळे भाजीतील पोषक तत्व शरीराला मिळण्यास मदत होईल. - आता एका बाऊलमध्ये पालक, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि मीठ एकत्र करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये गव्हाचं पिठ आणि इतर सर्व साहित्य एकत्र करा. सर्व मिश्रण पिठाप्रमाणे व्यवस्थित एकजीव करून मळून घ्या. 

- त्यानंतर तयार पिठाच्या छोटे-छोटे गोळे तयार करून चपातीप्रमाणे लाटून घ्या. 

- एक पॅन गरम करून त्यावर तेल किंवा तूप टाका. 

- आता गरम पॅनवर पराठा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या. 

- पराठा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजल्यानंतर प्लेटमध्ये काढून सर्व्ह करा. 

टॅग्स :ReceipeपाककृतीHealthआरोग्य