शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

झणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 17:57 IST

प्रत्येक प्रांतागणिक संस्कृती बदलते. आता खाद्य संस्कृतीचंच पाहा ना... प्रत्येक देश, राज्य आणि इतकचं नाही तर शहरागणिकही खाद्यसंस्कृतीमध्ये फरक दिसून येतो. असंच काहीसं मिसळीच्याबाबतीत आढळून येतं. मिसळ म्हणजे महाराष्ट्राच्या रांगड्या मातीतला पदार्थ.

प्रत्येक प्रांतागणिक संस्कृती बदलते. आता खाद्यसंस्कृतीचंच पाहा ना... प्रत्येक देश, राज्य आणि इतकचं नाही तर शहरागणिकही खाद्यसंस्कृतीमध्ये फरक दिसून येतो. असंच काहीसं मिसळीच्याबाबतीत आढळून येतं. मिसळ म्हणजे महाराष्ट्राच्या रांगड्या मातीतला पदार्थ. पण महाराष्ट्रातील प्रत्येक शहरामध्ये हिची वेगळी चव चाखायला मिळते. पुणेरी मिसळ, कोल्हापूरी मिसळ, नाशिकची मिसळ यांसारख्या अनेक शहरांमध्ये मिसळींची वेगळी चव चाखायला मिळते. पण त्यातल्यात्यात आपला झणझणीतपणा आणि तर्रीबाज ठसक्यासाठी ओळखली जाणारी मिसळ म्हणजे कोल्हापूरी मिसळ. पण ही मिसळ खाण्यासाठी तुम्हाला कोल्हापूर गाठायची अजिबात गरज नाही. तुम्ही घरच्या घरी अगदी सहज सोप्या पद्धतीने कोल्हापूरी मिसळ तयार करू शकता. जाणून घेऊया कोल्हापूरी मिसळ तयार करण्याची रेसिपी...

साहित्य :

  • 4 कप मोड आलेली मटकी
  • मीठ चवीनुसार
  • 2 चमचे गरम मसाला
  • 2 चमचे हळद
  • 1 चमचा आल्याची पेस्ट
  • जीरं
  • मोहरी
  • 1 ½ कांदा
  • 4 कप पाणी 
  • 2 चमचे धने पावडर
  • 4 चमचे लाल मिरची पावडर 
  • 2 टोमॅटो 
  • तेल
  • 1 कप शेव 
  • बारिक चिरलेली कोथिंबीर
  • मिसळसोबत खाण्यासाठी पाव

 

कृती :

- सर्वात आधी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.

- एक कढई मंद आचेवर गरम करत ठेवा. त्यामध्ये 2 चमचे तेल ओता. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जीरं आणि मोहरी टाका. थोडं तडतडल्यावर त्यामध्ये बारिक चिरलेला कांदा, हळद टाकून हे मिश्रण मंद आचेवर परतून घ्या. 

- या मिश्रणामध्ये मोड आलेली मटकी आणि आलं लसणाची पेस्ट टाका. मिश्रण नीट एकजीव होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये धने पावडर, गरम मसाला, मिरची पावडर आणि टॉमेटो पेस्ट टाका आणि परतून घ्या. आता यामध्ये 4 कप पाणी टाका आणि मटकी शिजेपर्यंत शिजवून घ्या. 

- मिश्रण एकत्र झाल्यानंतर एक उकळी येऊ द्या. मिसळ तयार आहे. त्यानंतर कोथिंबीर आणि शेव टाकून पावासोबत सर्व्ह करा झणझणीत तर्रीबाज कोल्हापूरी मिसळ. 

टॅग्स :Receipeपाककृतीkolhapurकोल्हापूर