शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात अनेक आजारांपासून वाचवेल शेवग्याच्या पानांचा खास काढा, जाणून घ्या कसा बनवाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 12:23 IST

Moringa Leaves Kadha : शेवग्याच्या पानांचं नियमित सेवन केल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. अशात हिवाळ्यात शेवग्याच्या पानांचा काढा पिण्याचे फायदे आणि तो तयार करण्याची पद्धत आम्ही सांगणार आहोत.

Moringa Leaves Kadha : शेवग्याची पाने, फुलं आणि पानांचा वापर फार पूर्वीपासून औषधी म्हणून केला जातो. शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अमीनो अ‍ॅसिड असतं. या पानांचं नियमित सेवन केल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. अशात हिवाळ्यात शेवग्याच्या पानांचा काढा पिण्याचे फायदे आणि तो तयार करण्याची पद्धत आम्ही सांगणार आहोत.

हाडे होतील मजबूत

शेवग्याच्या पानांचा काढा प्यायल्याने तुमच्या हाडांना पोषण मिळतं. ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. यातील कॅल्शिअमने बोन डेंसिटी वाढते, तर फॉस्फोरसने हाडांचं आरोग्य चांगलं राहतं. या काढ्याचं नियमितपणे सेवन केल्याने हाडांसंबंधी समस्या ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.

ब्लड प्रेशर कंट्रोल

शेवग्याच्या पानांचं नियमितपणे सेवन केल्याने ब्लड प्रेशर कंट्रोल राहण्यास मदत मिळते. याने तुमच्या ब्लड वेलल्स हेल्दी राहतात, ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन सुरळीत होतं. सोबतच कोलेस्ट्रॉल कंट्रोल करून हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल तर या पानांचा काढा नियमित सेवन करा.

बद्धकोष्ठता होईल दूर

शेवग्याच्या पानांचा काढा पोटासंबंधीही अनेक समस्या दूर करण्यासाठी रामबाण उपाय आहे. बद्धकोष्ठता, गॅस, अपचन अशा समस्या दूर करण्यात हा काढा मदत करतो. या काढ्याने पोटही चांगलं साफ होतं. यातील अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण पोटातील सूज आणि जळजळ कमी करतात. ज्यामुळे गॅस आणि पचन होत नाही.

वजन कमी करतो

या पानांच्या काढ्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे कॅलरी बर्न होण्याची प्रक्रियाही वेगाने होते. अशात तुम्हाला वेगाने वजन कमी करण्यास मदत मिळते. त्याशिवाय या पानांमध्ये फायबर भरपूर असतं, ज्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. अशात तुम्ही ओव्हरईटींगपासून वाचता.

रक्त शुद्ध होतं

शेवग्याच्या पानांचा काढा प्यायल्याने शरीरातील रक्त शुद्ध होतं. यातील तत्वांमुळे शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात. अशात वेगवेगळ्या आजारांचा धोका कमी होतो आणि रक्त शुद्ध झाल्याने त्वचेसंबंधी समस्याही होत नाही.

कसा तयार कराल हा काढा?

शेवग्याच्या पानांचा काढा बनवण्यासाठी सगळ्यात आधी काही पाने चांगली धुवून घ्या. दोन कप पाणी एका भांड्यात टाकून पाने चांगली उकडू द्या. पाणी अर्ध शिल्लक राहिल्यावर गॅस बंद करा. आता यात थोडं काळी मिरी पावडर आणि काळं मीठ टाकून मिक्स करा. कोमट किंवा थंड झाल्यावर याचं सेवन करा.

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स