शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

असा तयार करा शरीराला थंडावा देणारा 'रोज बदाम शेक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 18:00 IST

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, दूध आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. दूधामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असतत. तसेच दूध आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरतं.

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, दूध आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. दूधामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असतत. तसेच दूध आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरतं. त्यामुळे अनेकदा डॉक्टर्सही तज्ज्ञांसोबतच लहान मुलांनाही दूध पिण्याचा सल्ला देतात. परंतु मुलं दूध पिण्यासाठी नाक-तोंड मुरडतात. खरं तर दूधामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम असल्यामुळे ते हाडांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अशातच मुलांना दूध पिण्यासाठी भाग पाडणं अत्यंत अवघड असतं. अशावेळी तुम्ही दूधासोबत इतर हेल्दी पदार्थ एकत्र करून पिण्यासाठी देऊ शकता. आज आम्हीही अशीच एक हटके रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घेऊया रोज बदाम शेक तयार करण्याची रेसिपी...

साहित्य : 

  • 100 ग्रॅम बदाम 
  • काळी मिरी 
  • बडिशोप 
  • 600 ग्रॅम साखर 
  • केशर 
  • गुलाबाच्य सुकलेल्या पाकळ्या 
  • कलिंगडाच्या सुकलेल्या बिया 

 

तयार करण्याची पद्धत : 

- साखर आणि पाकळ्यांव्यतिरिक्त बाकी सर्व पदार्थ मिक्सरमध्ये एकत्र करून घ्या. - गुलाबाच्या पाकळ्या 5 ते 6 तासांसाठी पाण्यामध्ये ठेवून पाणी वेगळं करून घ्या.- पाण्यामध्ये साखर आणि मिक्सरमध्ये तयार केलेली पेस्ट एका भांड्यामध्ये एकत्र करून उकळून घ्या. - मिश्रण अर्धं होईपर्यंत उकळून घ्या. - थंड झाल्यानंतर एका काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. - त्यानंतर ग्लासमध्ये घेऊन त्यामध्ये थंड दूध एकत्र करून सर्व्ह करा. 

गुलाबाच्या पाकळ्यांचे फायदे : 

गुलाबाच्या पाकळ्यांच्या मदतीने तुम्ही फॅट कमी करु शकता. गुलाबात लॅक्सेटिव आणि ड्यूरेटिक गुण असतात. जे मेटोबॉलिज्मला वाढवतात, पोट साफ ठेवतात, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात आणि पचनक्रिया सुधारतात. त्यामुळे तुमचं वजन कमी होतं. त्यासोबतच गुलाबाच्या पाकळ्या तुमच्या स्कीनसाठीही फायद्याच्या आहेत. याने तुमचा चेहरा अधिक चमकदार होतो कारण गुलाबाच्या पाकळ्यांनी रक्त शुद्ध होतं. याशिवाय पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी, माउथ अल्सरपासून सुटका करण्यासाठी तसेच डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठीही गुलाबाची पाकळी मदत करते. 

कलिंगडाच्या बियांचे फायदे :

कलिंगड हे उन्हाळ्यात वरदान मानलं जातं. कारण यात भरपूर प्रमाणात पाणी असल्याने उन्हाळ्यात होणाऱ्या वेगवेगळ्या समस्या याने दूर होतात. याने ना केवळ आरोग्याला फायदा तर सौंदर्यासाठीही कलिंगड फायदेशीर ठरतं. पण अनेकजण कलिंगडातील बीया फेकून देतात. पण कलिंगडाच्या बीया सुद्धा तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. कलिंगडाच्या बियांनी तुम्हाला लैंगिक समस्या, मधुमेह, हृदयरोग, त्वचा आणि केसांसंबधी समस्या दूर करण्यास मदत मिळते. 

टॅग्स :ReceipeपाककृतीHealthy Diet Planपौष्टिक आहारSummer Specialसमर स्पेशलHealth Tipsहेल्थ टिप्स