शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चटपटीत नाष्ट्यासाठी बनवा मराठमोळी उकडपेंडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 17:51 IST

सातूचे पीठ, उकडपेंडी असे घरगुती, चटपटीत आणि पौष्टिक नाष्ट्याचे पदार्थ आता नामशेष होत आहेत. त्यातल्या उकडपेंडीची रेसिपी आज आपल्यासाठी देत आहोत.

काही पदार्थ आपण विसरत चाललो आहोत. पोहे, उपमा, मॅगी, थालीपीठाच्या जमान्यात सातूचे पीठ, उकडपेंडी असे घरगुती, चटपटीत आणि पौष्टिक नाष्ट्याचे पदार्थ आता नामशेष होत आहेत. त्यातल्या उकडपेंडीची रेसिपी आज आपल्यासाठी देत आहोत. घरात नेहमी उपलब्ध असणाऱ्या सामानातून तयार होणारा हा पदार्थ चवदार तर आहेच पण कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला आवडेल असाच आहे. शक्यतो गव्हाच्या पीठाचा केला जाणारा हा पदार्थ काहीवेळा ज्वारीच्या पीठापासूनही केला जातो. चला तर बघूया कशी करायची उकडपेंडी. साहित्य :

  • कणिक 2 वाट्या चाळून घेऊ नये (गव्हाचे पीठ)
  • 1 मोठा पेला पाणी (गरम)
  • 2 मोठे चमचे तेल 
  • मोहरी 1 चमचा
  • जिरे 2 चमचे
  • हळद अर्धा चमचा
  • 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या
  • मध्यम आकाराचे दोन कांदे   
  • मिरच्या चार ते पाच 
  • मीठ चवीनुसार
  • आंबट दही 1 वाटी
  • कोथिंबीर
  • कढीपत्ता

 

कृती :

  • कांदे , हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घ्या. 

 

  • एक मोठा पेला गरम पाणी करायला ठेवा. 

 

  • लसूण बारीक चिरून किंवा ठेचून घ्या. 

 

  • कढईत कणिक खरपूस आणि गुलाबीसर भाजून घ्या. या पदार्थात कणिक भाजणे महत्त्वाचे आहे. अन्यथा कचवट चव लागते. छान घमघमाट सुटेल अशी कणिक भाजावी. भाजल्यावर ती हलकी होते. 

 

  • आता एका कढईत 2  मोठे चमचे तेल गरम करायला ठेवा व त्यात मोहरी टाकून तडतडू द्या .

 

  • आता त्यात हिरवी मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता आणि जिरे घाला. कढईत कांदा टाकून गुलाबीसर परतून घ्या. 

 

  • कांदा परतल्यावर त्यात मीठ आणि हळद घाला आणि पाण्यात गरम पाणी व दही घाला. 

 

  • आता हे सर्व पाणी उकळल्यावर त्यात शेवटी कणिक टाका. 

 

  • कणिक बुडाला लागू देऊ नका. उकरपेंडी जाळल्यास कडवट वास लागतो. त्यामुळे गॅस बारीक ठेवावा. 

 

  • एक वाफ द्यावी आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करावी उकरपेंडी. 

 

  • सर्व्ह करताना आवडत असल्यास ओले खोबरेही घालू शकता. दही नसल्यास फोडणीत टोमॅटोचे काप किंवा लिंबू पिळून टाकू शकता. 

 

  • पावसाळ्यात उकडपेंडी हा उत्तम पर्याय आहे. तेव्हा नक्की करून बघा आणि आम्हाला प्रतिक्रीया कळवायला विसरू नका. 
टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न