झटपट माझा मोदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 03:38 PM2020-08-17T15:38:23+5:302020-08-21T15:17:40+5:30

या गणेशोत्सवात माझा हे अस्सल हापूस आंब्याची चव देणारं माझा वापरून तुम्ही मँगो फ्लेवरचे मोदक करू शकता.

Maaza Modak Recipe : Quick Maaza Modak. | झटपट माझा मोदक

झटपट माझा मोदक

Next

उकडीचे मोदक, माव्याचे मोदक, काजू मोदक, चॉकलेट मोदक असे वेगवेगळे मोदक तुम्ही ट्राय करून पाहिले असतीलच. असे मोदक तयार करण्यासाठी तुलनेनं जास्त वेळ लागतो. तुम्ही कमी वेळात बाप्पासाठी अप्रतिम नैवेदय तयार करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला रत्नागिरीच्या हापूस आंब्याच्या फ्लेवरची भन्नाट माझा मोदक रेसीपी सांगणार आहोत. 

या गणेशोत्सवात माझा हे अस्सल हापूस आंब्याची चव देणारं माझा वापरून तुम्ही मँगो फ्लेवरचे मोदक करू शकता. अगदी झटपट होणारी ही रेसेपी आहे. चला तर मग  जाणून घेऊया कसे तयार करायचे झटपट माझा मोदक.

झटपट माझा मोदकासाठी लागणारं साहित्य

३५० मिली माझा पेय

अर्धी वाटी साजूक तूप

१ वाटी बारीक रवा

१ वाटी साखर

वेलची पावडर.

कृती

सगळ्यात आधी कढई गरम करून घ्या.

त्यानंतर त्यात रवा घालून लालसर होईपर्यंत  भाजून घ्या.

रवा भाजल्यानंतर एक ते दीड पेला गरेजनुसार मँगो माझा घाला. त्यानंतर रव्याचं मिश्रण घट्ट् होईपर्यंत ढवळत राहा. ढवळलं नाही तर गुठळ्या पडू शकतात. माझा खास रत्नागिरीच्या  हापूस आंब्यांपासून तयार केलं असल्यामुळे रव्यात सहज एकजीव होतं आणि माझाच्या स्मूथ आणि थीक  टेक्स्चरमुळे अफलातून चव येते. 

मिश्रण  घट्ट झाल्यानंतर त्यात वेलची पूड आणि आवडीप्रमाणे साखर घाला. हे मिश्रण एकजीव घाल्यानंतर गॅस बंद करा.

मोदकाच्या साच्याला तूप लावून हे मिश्रण त्यात घालून मोदक तयार करा तयार आहेत आपले झटपट 'मँगो माझा मोदक'. माझामुळे रिच टेस्ट मोदकांना येते.

माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अ‍ॅमेझॉन इको प्लस (2nd generation).

 रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.

Web Title: Maaza Modak Recipe : Quick Maaza Modak.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.