तळलेले माझा मोदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 11:24 PM2020-08-14T23:24:03+5:302020-08-17T13:33:55+5:30

रत्नागिरीच्या हापूस आंब्याच्या फ्लेवरचे मोदक गणेशोत्सवासाठी तयार करू शकता.

Maaza Modak Recipe : Fried Mazza modak | तळलेले माझा मोदक

तळलेले माझा मोदक

fsharetweetwhatsappNext »

गणेशोत्सव सुरू व्हायला काही दिवस बाकी आहेत. अशात  सर्वच घरातील गृहिणींची लगबग सुरू असणार.  सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणताही सण उत्सव आल्यानंतर गोडा धोडाचं काय करायचं असा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो. नेहमीपेक्षा वेगळं काही करावं असं घरातील प्रत्येकालाच वाटत असतं. तुम्ही सुद्धा असा विचार करत  असाल तर आज आम्ही तुम्हाला एक नवीन आयडिया सांगणार आहोत. जेणेकरून घरातील मंडळी आणि गणपती बाप्पा तुफान खुश होतील.

उकडीचे मोदक,  माव्याचे मोदक, रवा मोदक, काजू मोदक आपण नेहमीच तयार करतो. दरवर्षी वेगळं काय बरं करायचं असा प्रश्न अनेकांना पडतो.   यावर्षी तुम्ही अस्सल रत्नागिरीच्या हापूस आंब्याच्या फ्लेवरचे मोदक गणेशोत्सवासाठी तयार करू शकता.  बाजारात आपल्याला हवे तसे फ्लेवर्स उपलब्ध नसतात. असले तरी त्याचा वापर कशाप्रकारे करता येईल याची कल्पना नसते.  पण आंब्यापासून तयार  झालेल्या  माझाचा वापर करून तुम्ही बाप्पाच्या आवडीचे मँगो फ्लेवरचे मोदक तयार करू शकता. माझा हे रत्नागिरीच्या हापूस आंब्यापासून तयार केलेलं पेय आहे. चला तर मग जाणून घेऊया कसे तयार करायचे अस्सल हापूस आंब्याचे माझा तळलेले मोदक .

साहित्य:

३५० मीली माझा पेय
१/२ कप खिरापत
१/२ कप मैदा
१/२ कप बारीक रवा
२ टेस्पून तेल
चिमूटभर मिठ
तळण्यासाठी तेल/ तूप
१ टीस्पून दूध
ओल्या नारळाचे सारण भरायचे असेल तर ओल्या नारळाच्या करंज्यांचे सारण वापरावे.

कृती:
१) मैदा आणि रव एकत्र करून घ्यावा. २ चमचे तेल कडकडीत गरम करून मोहन घालावे. किंचीत मिठ घालून हाताने मिक्स करावे. थोडे थोडे  माझा आणि  थोडसं पाणी घालून  घट्ट मळून घ्यावे. साधारण अर्धा तास झाकून ठेवावे. आवश्यकतेनुसार माझा अजून घालावा. पीठात मिसळताना माझा पेय हे रुम टेंमरेचरवर असावे. रियल हापूस आंब्यांपासून तयार केलेलं असल्यामुळे सहज कोणत्याही पदार्थात उत्तमरीत्या एकत्र होतं. माझामुळे स्मूथ आणि ठीक टेक्स्चर कणकेला येईल. 

२) अर्ध्या तासाने पिठ पुन्हा एकदा चांगले मळून घ्यावे. मळलेल्या पिठाचे साधारण दिड इंचाचे समान गोळे करून घ्यावे. तळण्यासाठी तेल गरम करण्यास ठेवावे. प्रत्येक गोळ्याची पुरी लाटून घ्यावी. पुरी एका हाताच्या तळव्यावर ठेवून दुसर्‍या हाताने मुखर्‍या पाडाव्यात. मध्यभागी जो खळगा झाला असेल त्यात १ चमचा सारण भरावे. सर्व मुखर्‍या एकत्र करून कळी बनवावी आणि १ थेंब दुधाचं बोट घेवून कळी निट बंद करावी. सर्व मोदक मंद आचेवर तळून घ्यावे. तळल्यानंतर छान हापूस आंब्याच्या फ्लेवरचे पिवळसर  रंगाचे मोदक तयार होतील. माझाची रिच टेस्ट मोदकांना येईल. 

१) पिठ थोडे कोरडे असल्याने बंद केलेली कळी बर्‍याचदा तेलात उघडली जाते आणि सारण बाहेर येते, नाहीतर तेल आत जाऊन मोदक तेलकट होतो. म्हणून थोडे दुध लावल्यास कळी पक्की बंद होते. फक्त अगदी कणच दुध वापरावे.

२) मोदक मंद आचेवरच तळावे. मोठ्या आचेवर तळल्यास तापलेल्या तेलामुळे बाहेरून तळलेले वाटतात पण आतून कच्चे राहतात आणि लगेच मऊ पडतात.

'माझा मोदक' स्पर्धेत सहभागी व्हा... आपल्या मोदकांच्या रेसिपीचा व्हिडीओ www.lokmat.com/maazamodak/ या वेबसाईटवर पाठवा... पहिले पाच विजेते ठरतील आयफोन 7 चे मानकरी, तर त्यापुढच्या पाच विजेत्यांना मिळणार आहे, अ‍ॅमेझॉन इको प्लस सेकंड जनरेशन!

रेसिपी करायला आतूर झाला आहात?... तुम्हीही बनवू शकता झक्कास माझा मोदक. www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझा खरेदी करा आणि आपल्या साहित्यासह सज्ज व्हा!

'MAAZAMODAK' हा कोड वापरा आणि १.२ लिटरच्या बॉटलवर/बाटलीवर मिळवा १०% सूट. आजच खरेदी करा!

 

Web Title: Maaza Modak Recipe : Fried Mazza modak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.