शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

फायदे वाचून रोज खाल इडली ढोकळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 16:14 IST

आपले पारंपारिक पदार्थ फक्त चविष्टचं नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. प्रत्येक प्रदेशाच्या भौगोलिक रचनेनुसार त्या प्रदेशाची खाद्यसंस्कृती जन्म घेत असते. आता कोणत्याही प्रदेशातील पदार्थ अगदी सहज कुठेही उपलब्ध होतात.

आपले पारंपारिक पदार्थ फक्त चविष्टचं नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. प्रत्येक प्रदेशाच्या भौगोलिक रचनेनुसार त्या प्रदेशाची खाद्यसंस्कृती जन्म घेत असते. आता कोणत्याही प्रदेशातील पदार्थ अगदी सहज कुठेही उपलब्ध होतात. आज जाणून घेऊयात अशा रिजनल पदार्थांबाबत जे स्वादिष्ट आहेतच परंतु फिटनेससाठीही ते फायदेशीर ठरतात. लो कॅलरी असलेल्या या पदार्थांना तुम्ही तुमच्या विकली मेन्यूमध्येही समाविष्ट करू शकता.

मऊ आणि लूसलूशीत इडली खाण्याचे फायदे

सकाळचा नाश्ता असो  किंवा मधल्या वेळीची भूक भागवणं. वाफळतं सांबर आणि फोडणी दिलेली खोबऱ्याची चटणीसोबत खाण्यात येणारी इडली प्रत्येकालाच आवडते. प्रामुख्याने दक्षिण भारतातील असलेला हा पदार्थ अगदी परदेशातही चवीने खाण्यात येतो. इडली तयार करण्यासाठी तांदूळ आणि उडदाच्या डाळीचा वापर करण्यात येतो. यामुळे यामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्स मोठ्या प्रमाणावर असतात. तर फॅट्स फार कमी असतात. त्यामुळे पचण्यास फार हलकी असते. जर तुम्ही तुमचं वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर इडली खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं. इडलीमध्ये फार कमी प्रमाणात सोडिअम असतं. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यासही हा उत्तम पर्याय आहे. याव्यतिरिक्त इडलीमध्ये आयर्न, कॅल्शिअम, फोलेट अॅसिड, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी देखील असतं. 

गुजरातची शान म्हणून ओळखला जाणारा खमंग ढोकळा 

ढोकळा गुजरातमध्ये लोकप्रिय आहेच पण त्याचबरोबर आता हा संपूर्ण देशभरात मिळणारा पदार्थ आहे. ढोकळा सहज कुठल्याही प्रांतात सहज उपलब्ध होतो. एवढंच नव्हे तर विदेशातील अनेक रेस्टॉरंट्सच्या मेन्यूमध्ये ढोकळ्याचा समावेश आवर्जून करण्यात येतो. सर्वांना आवडणारा हा ढोकळा डायबिटीजच्या रूग्णांसाठी फायदेशीर असतो. ढोकळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये फार कमी कॅलरीज असतात. 100 ग्रॅम ढोकळ्यामध्ये फक्त 160 कॅलरी असतात. यामध्ये बेसन म्हणजेच चण्याच्या पिठाचा समावेश असल्यामुळे यातील पोषक तत्व आणखी वाढतात. यामध्ये चण्याच्या डाळीचं पिठ असल्यामुळे फायबर आणि प्रोटीन्स मुबलक प्रमाणात असतात. ढोकळ्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स असतं, त्यामुळे  डायबिटीजच्या रूग्णांसाठी हा पदार्थ फायदेशीर ठरतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य