शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

हिवाळ्यात डिंकाचे सेवन कराल तर 'या' आजारांपासून दूर रहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 11:53 AM

हिवाळा सुरू होऊन २ महीने झाले आहेत. वातावरणात थंडी पसरली आहे.

हिवाळा सुरू होऊन २ महीने झाले आहेत. वातावरणात थंडी पसरली आहे. अशा वातावरणात थंडीमुळे होत असलेल्या आजारांपासून बचाव करण्यासाठी  विशेष काळजी घेण्याची गरज असते. कारण शरीरात गरमीचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं असतं. कारण कोणताही आजाराचा सामना करण्याआधी घरगुची पदार्थांचा वापर करून आपण त्या आजारांशी लढू शकतो. चला तर मग जाणून घेऊया घरगुती वापरात असलेल्या आणि सहज कमी किमतीत उपलब्ध होत असलेल्या डिंकाचे काय आहेत फायदे.

भारतामध्ये डिंक मुख्यतः बाभळीच्या झाडापासून मिळवलं जातं. सध्या हिवाळा सुरु असल्यामुळे घराघरात मेथीचे लाडू आणि डिंकाचे लाडू तयार करण्याची तयारी सुरू  आहे. कारण डिंक हे आरोग्यासाठी लाभदायक ठरत असत. म्हणून अनेक स्त्रिया लाडू कुरकूरीत येण्यासाठी आणि त्यातून पोषक घटक शरीराला मिळण्यासाठी डिंकाचा वापर करतात. पण लाडूंमध्ये डिंक घातलेले सगळ्यांनाच आवडत असं नाही. काही लोक डिंक आणि त्यापासून तयार केलेले पदार्थ टाळतात.  पण जर तुम्हाला डिंकाचे आरोग्याच्या दृष्टीने होत असलेले फायदे माहीत नसतील तर आज आम्ही तुम्हाला त्या बद्द्ल माहिती देणार आहोत  चला तर मग जाणून घेऊया डिंकाचं सेवन केल्याने  शरीराला कोणते फायदे मिळतात.

पचनक्रीया सुधारते 

डिंकामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यासोबतच पोटाच्या इतर समस्या दूर होतात. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन डी कमी असणाऱ्या लोकांनी डिंकाचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. हे त्वचेची काळजी घेण्यासाठी ओळखलं जातं. डिंक रात्रभर पाण्यामध्ये ठेवून त्याची पौष्टीक पेस्ट तयार करा. त्यानंतर त्यामध्ये बदामाची पावडर आणि दूधही तुम्ही मिक्स करू शकता. दररोज सेवन केल्याने आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. 

सांधेदुखीपासून आराम

 

हिवाळ्यात डिंकांच सेवन केल्याने शरीरासाठी लाभदायक ठरत. त्यामुळे जर तुमचे गुडघे, पायय हात दुखत असतील तर आराम मिळतो, सांघेदुखीची समस्या उद्भवणं कमी होत. तसंच कमरेच्या दुखण्यावर सुध्दा आराम मिळतो.  हाडांना बळकटी देण्यासाठी डिंक फायदेशीर ठरतं.

महिलांसाठी फायदेशीर

डिंक शरीरातील अशक्तपणा दूर करण्यास मदत करतात आणि हे लाडू खाल्ल्याने शरीराचा अशक्तपणा कायमचा जातो. म्हणून ज्या स्त्रियांना अशक्तपणाचा त्रास असेल अश्यांनी दररोज डिंक लाडू खावे. तसंच  मणक्यांचा त्रास असल्यास  डिंकाचे सेवन केल्याल आराम मिळतो. तसंच वजन कमी करण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतं

गरोदर मातेसाठी उपयुक्त

बाळाच्या जन्मानंतर आईचे दूध वाढवण्यासाठी डिंक फायदेशीर ठरतं. म्हणून मातेला डिंकाचे लाडू खाण्यासाठी दिले जातात. त्यामुळे अशक्तपणा दूर होतो. तसंच महिलांची हाडं त्या वेळी काही प्रमाणात कमकूवत झालेली असतात. म्हणून त्यावेळी  हाडांना पोषण मिळण्यासाठी  डिंकाचं सेवन  करणं फायदेशीर ठरतं. 

हृदयासाठी फायदेशीर 

 

डिंकाचे सेवन केल्याने शरीरात रक्तपूरवठा व्यवस्थित राहतो. तसंच हृदयाशी निगडीत आजार होण्याचा धोका कमी होतो.  कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात राहतं.

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्न