शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Janmashtami 2018 : अशी नारळाची बर्फी जी तोंडात टाकताच विरघळेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 13:53 IST

Janmashtami 2018 : श्रावणातला सर्वात महत्वाचा आणि संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात येणारा सण म्हणजे कृष्ण जन्माष्टमी. या दिवशी रात्री 12 वाजता कृष्णाची पूजा करण्यात येते.

Janmashtami 2018 : श्रावणातला सर्वात महत्वाचा आणि संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात येणारा सण म्हणजे कृष्ण जन्माष्टमी. या दिवशी रात्री 12 वाजता कृष्णाची पूजा करण्यात येते. त्याला गोडाधोडाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. आज आम्ही तुम्हाला एका अशा मिठाईची रेसिपी सांगणार आहोत, जी तुम्ही घरच्या घरी सहज तयार करू शकता. जाणून घेऊयात घरच्या घरी नारळाची बर्फी तयार करण्याच्या रेसिपीबाबत. अशी नारळाची बर्फी जी खाताच तोंडात विरघळून जाईल...

साहित्य :

  • खवलेलं खोबरं - 250 ग्रॅम
  • साखर 200 ग्रॅम
  • दूध अर्धा कप
  • तूप 1 चमचा
  • वेलची पूड अर्धा चमचा
  • सुका मेवा (बारिक तुकडे)

 

कृती :

- एका बाउलमध्ये दूध घेवून त्यामध्ये साखर विरघळवून घ्या. 

- त्यामध्ये खवलेलं खोबरं टाकून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.

- कढई गॅसवर ठेवून थोडी तापू द्या. त्यामध्ये तयार मिश्रण घालून थोडं शिजवून घ्या. 

- मिश्रण जळणार नाही याची काळजी घ्या. 

- मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये वेलची पूड टाका आणि मिक्स करा.

- मिश्रण नीट एकजीव झाल्यानंतर थोडं घट्ट होऊ लागेल. त्यानंतर गॅस बंद करून कढई गॅसवरून उतरवा.

- एका ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये तूप लावा आणि त्यामध्ये तयार मिश्रण टाका. 

- त्या ताटामध्ये मिश्रण एका लेव्हलमध्ये पसरून घ्या.

- त्यानंतर ते ताट थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा.

- बर्फी व्यवस्थित घट्ट झाल्यानंतर तिच्या वड्या पाडा.

- एका ताटामध्ये बर्फी घेवून त्यावर सुका मेवा टाकून नैवेद्य दाखवा.

टॅग्स :Janmashtami 2018जन्माष्टमी 2018IndiaभारतReceipeपाककृती