Kothimbir Vadi Recipe : कुरकुरीत, खमंग कोथिंबीर वडी रेसिपी, एकदा खाल तर खातच रहाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 02:31 PM2019-11-22T14:31:01+5:302019-11-22T14:44:53+5:30

Kothimbir Vadi Recipe : कोथिंबीरवडी ही सगळ्यांनाच खायला आवडते. कोणत्याही सीजन मध्ये घराघरांत आवडीचा पदार्थ म्हणून कोथिंबीर वडी खाल्ली जाते.

How to make crispy kothimbir vadi | Kothimbir Vadi Recipe : कुरकुरीत, खमंग कोथिंबीर वडी रेसिपी, एकदा खाल तर खातच रहाल...

Kothimbir Vadi Recipe : कुरकुरीत, खमंग कोथिंबीर वडी रेसिपी, एकदा खाल तर खातच रहाल...

googlenewsNext

(image credit-.memaharashtrian)

कोथिंबीर वडी ही सगळ्यांनाच खायला आवडते. कोणत्याही सीजन मध्ये घराघरांत आवडीचा पदार्थ म्हणून कोथिंबीर वडी खाल्ली जाते. कोथिंबीर वडी कुरकुरीत आणि खमंग होण्यासाठी महिला वेगवेगळ्या पध्दती वापरतात. कोथिंबीरी ची स्वतःची अशी एक वेगळी चव असते. जी पदार्थाला एक स्वाद आणते. तसेच कोथिंबीरमध्ये अनेक औषधी गुण असतात. आपल्याला फक्त जेवणापुरतंच कोथिंबीर माहीत असते. कोथिंबीरीमधील पोषक तत्वामुळे त्वचेबरोबरच आपलं आरोग्यही चांगलं राहातं. तर मगं जाणून घ्या  कोथिंबीर वडी कशी खमंग तयार होईल.


साहीत्य-
१ कप बेसन
१/४ कप तांदळाचे पीठ
४ हिरवी मिरची
१ लसूण
१चमचा जिरे
१चमचा हळद
१/२ चमचा लाल मिरची पावडर
मीठ चवीनुसार
तळण्यासाठी तेल
१ टेबल स्पून तीळ

(image credit-Madhurasrecipe)

 

कृती-
कोथिंबीर एक जुडी घ्यावी. व्यवस्थित साफ करुन बारिक चिरुन पाण्यातून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यावी.
त्यानंतर कोणत्याही सुती कापडावर पंख्याखाली पसरुन ठेवा.
त्यामध्ये पाणी अजिबात राहायला नको.
आता साहित्य काय लागेल ते पाहुया.एक जुडी कोथिंबीरीसाठी एक कप बेसन, पाव कप तांदळाचे पीठ घ्यावे. तांदळाच्या पीठामुळे वडीला कुरकुरीतपणा येतो.
त्यानंतर त्यात हिरवी मिरची, लसूण यांची बारीक पेस्ट करून घ्यावी.
एक चमचा जिरे, एक चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर,मीठ चवीनुसार घ्यावं. आता कोथिंबीरीमध्ये वरील पदार्थ  टाकून पीठ चांगले मिसळून त्यात दोन ते तीन चमचे पाणी टाकून पीठ व्यवस्थितपणे मळुन घ्यावे.
जास्त पाणी टाकू नये. कोथिंबीरी मध्ये मीठ असल्याने त्याला नंतर पाणी सुटते
पीठ पातळ झाले तर वडी कुरकुरीत होणार नाहीत. त्यात थोडे तेल घालून पीठ व्यवस्थितपणे मळुन घ्यावे.
 पीठात  तेल  घातल्याने हाताला चिकटणार नाही.
नंतर त्याचे रोल्स करून ते वाफवण्यासाठी एक चाळण घ्यावी. त्या चाळणीला तेल लावून घ्यावे. त्यामुळे ते चाळणीला चिकटणार नाहीत. नंतर कढईत पाणी गरम करून त्यावर ही चाळण झाकून १५ मिनिटांसाठी वाफवायला ठेवावी.
१५ मिनिटांनी झाकण काढून थंड होण्यासाठी ठेवावे.
थंड झाल्यावर त्याचे काप करावेत.एका कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर वड्या चांगला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्याव्या.
त्यानंतर प्लेट मध्ये टिश्यू पेपरवर वड्या काढून घ्याव्यात असं केल्याने जास्तीचे तेल निघून जाईल.
यामध्ये लाल मिरची पावडर टाकल्याने त्याचा रंग लालसर होईल. तुम्ही फक्त लसूण मिरची पेस्ट सुध्दा टाकू शकता. ही वडी इतकी चविष्ट लागते ती अशी खाल्ली तरीही खुप छान लागते.
तुम्ही ही वडी सॉस किंवा चटणी सोबत खाऊ शकता.
 

Web Title: How to make crispy kothimbir vadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.