शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

अमेरिकन स्वीटकॉर्न भारतात कसा आला?; जाणून घ्या रंजक गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 05:23 IST

बाजारात स्वीटकॉर्नचे ढीग. पांढरा मका अपवादानेच बघायला मिळतोय. पण विचार करा- ज्याला आपण देशी म्हणतो तो पांढरा मका तरी संपूर्ण देशी कुठे होता? तोही अमेरिकन! 

- मेघना सामंत

मक्याचे दिवस आहेत. पांढरा देशी मका आणि पिवळारंजन अमेरिकन स्वीटकॉर्न या दोन्हीपैकी कोणता मका अधिक पोषक यावरून सध्या आहारतज्ज्ञांमध्ये जुंपलीये. एक खरं की भारतात तरी अमेरिकन स्वीटकॉर्नने पांढऱ्या मक्याला साफ झोपवलेलं आहे. मुंबईत जागोजागी, समुद्रकिनाऱ्यांवर भुट्ट्याच्या गाड्या लागत, त्या सगळ्या स्वीटकॉर्ननी भरून गेल्यात. बाजारात स्वीटकॉर्नचे ढीग. पांढरा मका अपवादानेच बघायला मिळतोय. पण विचार करा- ज्याला आपण देशी म्हणतो तो पांढरा मका तरी संपूर्ण देशी कुठे होता? तोही अमेरिकन! तीनेकशे वर्षांपूर्वीपर्यंत भारतातल्या एकाही पाककृतीत मक्याचा उल्लेखसुद्धा आढळत नाही (त्यामुळेच मंदिरांतल्या मकासदृश शिल्पांबद्दल गूढ आहे). तो पोर्तुगीजांसोबत आला, त्याहीपेक्षा तो ब्रिटिशांनी लोकप्रिय केला. बटर चोपडलेलं उकडलेलं कणीस- ‘कॉर्न ऑन द कॉब’ हे त्यांचं लाडकं खाणं.भारतात मक्याची शेती फळफळली. त्याचं कारण तो लोकांना खायला आवडला यापेक्षाही शेतीच्या आर्थिक गणितात अधिक. आपल्याकडे मिलेट्स म्हणजे भरडधान्यांची शेती जोरात होती. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, राळा ही पौष्टिक धान्यं आपण नियमित खात होतो. मात्र मिलेट्सची शेती तितकीशी फायदेशीर नाही. दाणा अगदी बारीक, फोलपटं कमी, त्यामुळे तयार दाणे सहजपणे पक्ष्यांच्या, कीटकांच्या भक्ष्यस्थानी पडतात. हातात प्रत्यक्ष पीक फार कमी येतं. मका तुलनेत सणसणीत. कणसांचं आवरणही चांगलं जाड, संरक्षक. त्यामुळे मिलेट्सचं क्षेत्र हळूहळू मक्याने व्यापून टाकलं. व्यावहारिक जगात मक्याने भरडधान्यांना हरवलं. उपलब्धता कमी झाली तसतशी खाण्यातून भरडधान्यं मागे पडत गेली. त्यातच स्वीटकॉर्न अवतरला. ही प्रजाती अधिकच पीक देणारी. कमी पिठूळ, जास्त लुसलुशीत, शिजवायला सोपी. कणसं साठवायला, बाजारात पाठवायला सोयीस्कर, या जातीने पांढऱ्या मक्याची जागा घेणं साहजिक. शेतकऱ्यांची पीकनिवड आपल्या जेवण्याखाण्यावर कशी परिणाम करत असते पाहा. भरडधान्यं गेली, पांढरा मकाही गेला. आता जो मिळतोय तोच गोड मानून घेण्यावाचून गत्यंतर नाही (!) ज्यांना पूर्वीच्या मक्याची चव माहिती आहे त्यांनी सध्यातरी आठवणींवर समाधान मानावं. (लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)askwhy.meghana@gmail.com