शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कच्चं पनीर खाणं शरीरासाठी फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 17:15 IST

आपण हॉटेलमध्ये गेल्यावर  बऱ्याचदा पनीर असलेल्या पदार्थांची ऑर्डर देतो. पनीर काहींना खूप आवडते तर काहींना अजिबात नाही. दूधापासून तयार होणारं पनीर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतं. शाकाहारी लोकांची पहिली पसंती पनीरच असतं.

आपण हॉटेलमध्ये गेल्यावर  बऱ्याचदा पनीर असलेल्या पदार्थांची ऑर्डर देतो. पनीर काहींना खूप आवडते तर काहींना अजिबात नाही. दूधापासून तयार होणारं पनीर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतं. शाकाहारी लोकांची पहिली पसंती पनीरच असतं. पनीरमध्ये प्रोटीन, फॉस्फरस, न्यूट्रीशिअन्स आणि कॅल्शिअम असल्यानं ते आरोग्यदायी आहे. ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच मानसिक तणाव दूर ठेवण्यासाठी फायदेशीर असते. आपण अनेकदा केवळ हॉटेलमध्ये गेल्यावरच पनीर खाणं पसंत करतो. मात्र पनीरचे काही पदार्थ आपण घरीही करु शकतो. त्यामुळे पनीर खाणं आणि त्याचे फायदे जाणून घेणं आवश्यक आहे.

केव्हा खाल पनीर...कच्च्या पनीरचं सेवन नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या 1 तास अगोदर करावं.  तसेच व्यायामानंतर काही वेळानं पनीर खाणंही शरीरासाठी फायदेशीर असतं. याव्यतिरिक्त रात्रीच्या जेवणाआधी पनीर खाल्यानं शरीराला फायदा होतो. कारण रात्रीचं जेवणं पचवण्यासाठी शरिराला प्रोटीनची सर्वात जास्त गरज असते. पनीरमध्ये प्रोटीनची मात्रा अधिक असते.

1. हाडांच्या मजबूतीसाठी 

कच्च्या पनीरमध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरस असतं. त्यामुळे रोज पनीर खाल्यानं हाडं मजबूत होण्यासाठी मदत होते. तसेच याच्या सेवनानं सांधेदुखीवरही आराम मिळतो. 

2. चरबी कमी होण्यास उपयुक्त

प्रथिने आणि कॅल्शियमबरोबरच पनीरमध्ये कॉन्ज्युगेट लिनोलीक अॅसिड नामक फॅटी अॅसिड असते. यामुळे शरीरातील चरबी कमी होऊन वजन घटण्यास मदत होते. वजन कमी करायचे असल्यास आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.

3. मधुमेहावर नियंत्रण

कच्च्या पनीरमध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड असतं. त्यामुळे मधुमेहाच्या रूग्णांना फार फायदा होतो. रोज पनीर खाल्यानं शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. 

5. दात मजबूत होतात

पनीरमध्ये प्रोटिनबरोबरच कॅल्शियमही असते. यामुळे दात व हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. परंतु पनीर असलेले पदार्थ खाताना थोडा विचार करावा कारण त्यात कॅलरी जास्त असतात.

6. दात मजबुत होण्यासाठी उपयोगी

पनीरमध्ये प्रथिनं असतात. आपण नेहमी ऐकतो मात्र त्यामध्ये कॅल्शियमही जास्त असल्याने दात आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. 

7. भुकेवर नियंत्रण राहतं

पनीरमध्ये प्रोटिन्स असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर असलेले पदार्थ खाल्याने बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.

टीप : पनीरमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याने ज्यांना हृदयरोग, मधुमेह किंवा इतर काही त्रास असतील त्यांनी पनीर डॉक्टरांच्या सल्ल्याने पनीर खावे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नHealthआरोग्य