शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Happy Holi 2021: मऊ, लुसलुशीत पुरणपोळ्यांसाठी खास टिप्स; पहिल्याच घासात घरची मंडळी होतील खूश....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 14:15 IST

Happy Holi 2021 Holi Recipes : काहीजण पहिल्यांदा बनवत असतील तर विचारायलाच नको. कशा येतील, करपणार तर नाहीना? सारण बाहेर येईल का? साखरेचा आणि पीठाचा अंदाज चुकणार नाही ना. असे अनेक विचार मनात येतात.  

होळीचा सण अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपला आहे.  आता  लॉकडाऊन, कोरोनाची भीती यामुळे लोक बाहेर जाणार नाहीत. घरच्याघरी आपल्याला हवं ते बनवून नैवैद्य (Holi Recipes) दाखवून घराघरात होळी  साजरी केली जाणार आहे. होळी म्हटलं  की  पहिल्यांदा डोळ्यासमोर येतं ते म्हणजे पुरणपोळ्या. खायला मस्त गोड, खमंग, लुसलुशीत लागत असल्या तरी पुरणपोळी बनवायचं म्हणलं की साधी मेहनत लागत नाही!  काहीजण पहिल्यांदा बनवत असतील तर विचारायलाच नको. कशा येतील, करपणार तर नाहीना? सारण बाहेर येईल का? साखरेचा आणि पीठाचा अंदाज चुकणार नाही ना. असे अनेक विचार मनात येतात.  

महिलांची पुरणपोळी तयार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. पोळ्या मऊ आणि तोंडात टाकल्याबरोबरचं जीभेवर विरघळतील अशा असाव्यात. कारण आपण कितीही जरी बाहेरचं खाण्याचा आणि बाहेरचं मागवण्याचा अट्टहास केला तरी घरी तयार करून इतरांना खाऊ घालण्याची मजा काही वेगळीच असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पुरणपोळ्या मऊ कशा करायच्या ते सांगणार आहोत. 

सगळ्यांच्या घरी पुरणपोळी वेगवेगळी असते. वरचं आवरण अत्यंत पातळ असणारी, पुरेसं गोड आणि भरपूर पुरण भरलेली, उत्तम भाजलेली तेजस्वी पुरणपोळी करणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. कुठे तिचं आवरण जाड असतं, तर कुठे पोळीला खुसखुशीतपणाच नसतो. कुठे ती पुरेशी गोड नसते, तर कुठे पुरणाची पोळी असूनही पुरण अगदीच नावाला भरलेलं असतं, तर कुठे पुरणपोळी नीट भाजलेलीच नसते.

पुरणपोळीची सुरुवात पुरणापासून होते. त्यासाठी चणाडाळ अगदी उत्तम शिजवून चाळणीत घालून निथळून घेतलेली असते. निथळून घेतलेल्या डाळीमध्ये बारीक चिरलेला गूळ घालून पातेलं मंद विस्तवावर ठेवलं जातं. हळूहळू गूळ विरघळून डाळीशी एकजीव होऊ लागतो. प्रथम जरा पातळ होऊन पुरण हळूहळू घट्ट होऊ लागतं.

पुरण फारच मऊ असताना गॅसवरून उतरवलं तर त्यात थोडा पाण्याचा अंश (डाळीतील) राहिल्यानं कणकेच्या पारीमध्ये ते भरलं की पारी ओलसर होऊन फाटू शकते. ती फाटू नये यासाठी मग जाड करावी लागते ज्यामुळे पुरणपोळीवरचं आवरण जाड होतं. याउलट पुरण फार कोरडं होईपर्यंत गॅसवर ठेवलं तर ते फळफळीत होतं आणि पोळी लाटताना नीट पसरलं जात नाही. पुरण बरोबर झाल्याचा निकष म्हणजे त्यामधे झारा उभा ठेवला तर काही सेकंद तो उभा राहू शकतो. असं झालं की पुरण गॅसवरून उतरवून गरम असतानाच पुरणयंत्रातून वाटून घ्यावं.

पुरण वाटल्यावर त्यात अत्यंत बारीक वेलचीपूड आणि जायफळपूड घालून एकत्र करून पातेल्यावर कागद टाकून झाकून ठेवावं. पातळ टॉवेल झाकण म्हणून टाकला तरी चालतो. यामुळे वाफ धरून ती पुरणात पडत नाही आणि पुरण ओलसर होत नाही. या पद्धतीनं पुरणाला योग्य तेवढा मऊपणा येतो.पुरण तयार झाल्यावर कणीक भिजवायची असते. 

पोळी मऊसूत गुळगुळीत होण्यासाठी कणीक बारीक चाळणीनं चाळून घ्यावी. त्यात थोडं मीठ घालून सैलसर भिजवून अर्धा तास तरी ती तशीच ठेवावी. मग तेलाचा हात मधून मधून आणि पाण्याचा हात घेऊन ही कणीक खूप मळावी, तिंबावी. कणकेमध्ये एवढा मऊपणा आला पाहिजे की कणीक ताटावर एक फुटावर धरून हळूहळू खाली सोडली तर न तुटता ताटापर्यंत पोचली पाहिजे. यालाच जुन्या भाषेत कणकेला तार सुटली असं म्हटलं जातं.

दिवसाला फक्त १ केळी खाल्यानं वजन कमी होण्यासह मिळतात हे फायदे; या प्रकारचं केळं सगळ्यात जास्त गुणकारी

चाळून घेतलेली बारीक, मऊ कणीक असेल तर तार सुटण्यात अडचण येत नाही. मैद्यामध्ये कोंडा आणि बीज अजिबात नसल्यानं त्याला लवकर तार सुटते म्हणून काही ठिकाणी कणीक आणि मैदा किंवा रवा आणि मैदा पिठासाठी घेतले जातात. या कणकेची दोन रुपयाच्या नाण्याएवढी गोळी घेऊन तांदळाच्या पिठात बुडवून त्यावर त्याच्या तिप्पट ते चौपट मोठा पुरणाचा गोळा ठेवून हळूहळू पारी मोठी करून सर्व पुरण आत घालून पारी बंद करायची. तांदळाच्या पिठात घोळवून पोळपाटावर हातानं हलके सर्व बाजूंनी थापून पोळी मोठी करायची आणि मग खाली-वर तांदळाची पिठी घालून पोळी लाटण्यानं लाटून मोठी करायची.  

कमी कॅलरीजसह पौष्टीक नाष्ता करायचा असेल तर हे ५ पर्याय ठरतील बेस्ट ऑप्शन; फिट राहण्याचा सोपा फंडा

पोळी करताना अशी काळजी घ्या

पुरणपोळी भाजताना तव्याखाली विस्तव मध्यम हवा. तव्यावर पोळी वरची बाजू वरच ठेवून टाकायची. थोड्या वेळानं उलटून टाकायची. त्या पृष्ठभागावरील तांदळाचं पीठ मऊ रूमालानं काढून टाकावं. अशाप्रकारे पोळी दोन्ही बाजूंनी सोनेरी लालसर झाली की कागदावर काढून घेऊन दुसऱ्या मोठ्या कागदावर गार होण्यासाठी ठेवावी. गार झाल्यावर पोळ्या डब्यात भराव्यात. तयार आहेत पुरणपोळ्या. 

टॅग्स :foodअन्नHoliहोळीIndian Festivalsभारतीय सण