शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Utsav Special Recipe : बाप्पासाठी खास गोड गोड मोतीचूर लाडू; अगदी झटपट तयार होईल स्वादिष्ट नैवेद्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 17:14 IST

Ganesh Utsav Special Recipe : नारंगी रंगाचे मोतीचूर लाडू पाहताचक्षणी फस्त करण्याची इच्छा होते. मोतीचूर लाडू सगळ्यांनाच आवडतात.

येत्या काही दिवसात आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचे घरोघरी आगमन होईल. अनेकदा कामाची धावपळ आणि नैवेद्य तयार करण्यासाठी लागणारा वेळ यामुळे नैवेद्याचे पदार्थ बाहेरून आणले जातात. पण तुम्ही नैवेद्य घरी स्वतःच्या हातानं तयार केला तर त्याची मजा काही वेगळीच असते. मोदक, पेढे यांशिवाय बाप्पाच्या नैवेद्यात लाडूंचा समावेश असतोच.

नारंगी रंगाचे मोतीचूर लाडू पाहताचक्षणी फस्त करण्याची इच्छा होते. मोतीचूर लाडू सगळ्यांनाच आवडतात. म्हणूनच आम्ही तुम्हाला मोतीचूर लाडू तयार करण्याची खास रेसेपी सांगणार आहोत. हा नैवेद्य बनवल्यास बाप्पासह घरातील मंडळीही तुफान खूष होतील. 

साहित्य :

बेसन 60 ग्रॅम

केसर 

साखर अर्धा कप

दूध 2 चमचे

तेल किंवा तूप आवश्यकतेनुसार

पिस्ता किंवा बदामाचे तुकडे

मोतीचूर लाडू तयार करण्याची कृती

1) अर्धा कप बेसन आणि पाणी एका बाउलमध्ये घेऊन एक पेस्ट तयार करा. लक्षात ठेवा त्यामध्ये गुठळ्या ठेवू नका. त्यासाठी हे मिश्रण एका चाळणीने चाळून दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्या. 

2) एका पॅनमध्ये साखर आणि पाणी टाकून त्याचा पाक तयार करण्यासाठी ठेवा. साखर पूर्ण विरघळल्यानंतर त्यामध्ये थोडं दूध टाकून थोडा वेळ शिजवून घ्या. त्यानंतर  पाक तयार करा. 

3) एका कढईमध्ये आवश्यकतेनुसार, तेल किंवा तूप मध्यम आचेवर गरम करा. बेसनापासून तयार केलेल्या मिश्रणामध्ये छोट्या-छोट्या छिद्रांचा झारा बुडवा आणि कढईवर नेऊन हलकेच झटका द्या. जेणेकरून बेसनाचे छोटे छोटे थेंब कढईमध्ये पडतील. दुसऱ्या झाऱ्याने कढईतील बुंदी  एकत्र करा आणि पाकामध्ये टाका. 

4) बेसनाच्या संपूर्ण मिश्रणाची बुंदी तयार करून घ्या. तयार बुंदी पाकामध्ये एक तासापर्यंत मुरण्यासाठी ठेवा. त्यानंतर पाकामधून काढून लाडू वळून घ्या.  मोतीचूरच्या लाडूंचा नैवेद्य बाप्पसाठी तयार आहे. 

टॅग्स :foodअन्नRecipeपाककृतीGanpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपतीIndian Festivalsभारतीय सणGanesh Mahotsavगणेशोत्सव