आपल्यापैकी अनेकांना गोड भरपूर आवडते. मिठाई, खीर, केक गोडधोड व्यंजने म्हणजे काही खव्व्यांचा जीव की प्राण. गोडधोड खाणे ठिक आहे पण त्यामुळे वाढलेले वजन कमी करता करता नाकी नऊ येतात आणि इतर आजार होतात ते वेगळे. पण आता चिंता नको आम्ही तुमच्यासाठी शुगर फ्री डेझर्ट बनविण्याच्या दोन सोप्या रेसिपी आणल्या आहेत. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
फ्रुट शुगर फ्री डेझर्टसाहित्य-३०० ग्रॅम शुगर फ्री चॉकलेट वितळवून, ६ अंड्यातील पिवळा भाग, ६ चमचे डाईट स्वीटनर, २०० ग्रॅम फ्रेश व्हीप क्रीम, १ संत्राचा गर, स्ट्रॉबेरी, पपई, कलिंगड इत्यादी २०० ग्राम चिरलेली फळे, वितळलेले जिलेटीनकृती-एका भांड्यात शुगर फ्री आणि अंड्याचा पिवळ्या भागाला चांगल्या प्रकारे फेटून घ्या .यामध्ये वितळलेले जिलेटीन घाला, व्हीप क्रीम मिसळून फेटून घ्या. वितळलेले चॉकलेट आणि चिरलेली फळं आणि संत्र्याचा गर मिसळा. हे लहान कपमध्ये ओतून १ तास फ्रिजमध्ये ठेवा. १ तासानंतर फ्रिज मधून हे फ्रुट्स शुगर फ्री डेझर्ट काढून लगेचच सर्व्ह करा.
सफरचंद बर्फी
सफरचंद आपल्या शरीरासाठी किती पोषक ठरतं हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. कधीकधी घरामध्ये खूप सफरचंद आपण आणून ठेवतो. पण नुसतं खायचा कंंटाळा येतो. मग अशावेळी तुम्ही सोपी आणि सहज बनणारी सफरचंद बर्फी तयार करू शकता.
सफरचंदाची बर्फीसाहित्य १० सफरचंददुधी ३०० ग्रॅममावा २०० ग्रॅमगुलाबपाणी २० मिलीसाजूक तूप ५० ग्रॅम
कृती ७ सफरचंद आणि दुधी एकत्र किसून मिक्स करा. पॅनमध्ये तूप गरम करा. त्यामध्ये मावा घाला आणि भाजून घ्या. उरलेल्या ३ सफरचंदाचा रस काढून घ्या आणि यामध्ये मिक्स करा. व्यवस्थित जाड होईपर्यंत मंद आचेवर हे भाजत राहा. एका ट्रे मध्ये पूर्ण तूप लावून घ्या. त्यावर हे तयार झालेलं मिश्रण घाला आणि पसरवून घ्या. तुम्हाला हव्या तशा त्याच्या वड्या करून घ्या. सर्व करा.