शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जिऱ्याचं पाणी प्यायल्याने गॅसची समस्या खरंच दूर होते का? जाणून घ्या कसा कराल उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 10:54 IST

Cumin Water for Gas : एक खास उपाय म्हणजे जिऱ्याचं पाणी. पण खरंच जिऱ्याचं पाणी प्यायल्याने गॅसची समस्या दूर होते का? चला तर जाणून घेऊ कसा होतो याचा फायदा...

How to Make Cumin Water for Gas : पोटासंबंधी समस्या जसे की, गॅस, अ‍ॅसिडिटी, अपचन किंवा पोट फुगणे या समस्या आजकाल कॉमन झाल्या आहेत. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल यामुळे पोटासंबंधी या समस्या होत असतात. आयुर्वेदात या समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. ज्यांचा वापर करून गॅसची समस्या दूर होऊ शकते. यातीलच एक खास उपाय म्हणजे जिऱ्याचं पाणी. पण खरंच जिऱ्याचं पाणी प्यायल्याने गॅसची समस्या दूर होते का? चला तर जाणून घेऊ कसा होतो याचा फायदा...

जिऱ्यामधील पोषक तत्व

जिरे भारतीय किचनमध्ये वापरला जाणारा फार जुना मसाला आहे. या जेवणाची टेस्ट तर वाढतेच, सोबतच यात अनेक औषधी गुणही असतात. जिऱ्यामध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अ‍ॅंटी बॅक्टेरिअल गुण असतात. याने पचन तंत्र चांगलं राहतं आणि पोटासंबंधी समस्याही दूर होतात.

कसं बनवाल जिऱ्याचं पाणी?

जिऱ्याचं पाणी तयार करणं फारच सोपं आहे. यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे टाकून रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गरम करा, गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर सेवन करा. 

गॅसची समस्या कशी दूर करतं जिऱ्याचं पाणी?

पचनक्रिया सुधारते

जिऱ्याच्या पाण्यामुळे शरीरात पचनासाठी आवश्यक एंझाइम अधिक प्रमाणात रिलीज होण्यास मदत मिळते. ज्यामुळे अन्न चांगल्या पद्धतीने पचन होतं. यामुळे पोटात गॅस होण्याचा धोका कमी होतो.

अॅसिडिटी आणि अपचन दूर होतं

जिऱ्याच्या पाण्यामुळे अ‍ॅसिडिटी आणि अपचनाची समस्या दूर करण्यास मदत मिळते. ज्यामुळे पोट हलकं जाणवतं.

ब्लोटिंग होत नाही

पोटात सूज किंवा पोट फुगण्याची समस्या असल्यावर जिऱ्याच्या पाण्याचं सेवन केल्यास आराम मिळतो. याने गॅस्ट्रिक गॅस शरीरातून बाहेर निघण्यास मदत मिळते.

मेटाबॉलिज्म बूस्ट

रोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचं पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे शरीरात अन्न लवकर तोडलं जातं आणि पचनही लवकर होतं.

काही रिसर्चमधूनही हे समोर आलं आहे की, जिरे गॅस्ट्रिक समस्या दूर करण्यास प्रभावी ठरतं. कारण यातील तत्व पचन तंत्राच्या मसल्सना रिलॅक्स करतात. तसेच जिऱ्यामुळे आतड्यांचं आरोग्यही चांगलं राहतं. मात्र, जर तुम्हाला पोटासंबंधी काही गंभीर समस्या असेल तर केवळ हा उपाय करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स