शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

आइस्क्रिम मेकओव्हर करतय. दिल्लीत मिळणार्या आइस्क्रिम नूडल्सविषयी ऐकलय का तुम्ही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 6:05 PM

दिसायला नूडल्ससारख्याच लांबलचक असतात या नूडल्स, परंतु प्युअर आइस्क्रि मपासून नाही तर बाष्पीभवन केलेलं दूध आणि बर्फ यांचं एक मिश्रण तयार करून त्याला नूडल्सचा आकार देण्यात आलेला आहे. आणि या नूडल्स मग आइस्क्रि म बाऊलमध्ये आइस्क्रि मवर सर्व्ह केल्या जातात.

ठळक मुद्दे* आइस्क्रि म नूडल्स या अनोख्या आणि हटके प्रकाराचा उगम न्यूयार्कमधील डेझर्ट किचन या हॉटेलमधला आहे. तसेच जपानधील जेली नूडल्सच्या धर्तीवरच या नूडल्सचा लूक पाहायला मिळतो.* रोलअप आइस्क्रि म. हा देखील खूप हटके प्रकार आहे.. थायलंड, मलेशियातील हा प्रकार भारतातही (सध्या तरी दिल्लीत ) फेमस होतोय. फ्राइड आइस्क्रि म म्हणूनही हा प्रकार ओळखला जातो.* जपानच्या टाकोज धर्तीवर आइस्क्रिम टाकोज हा अगदी नवीन प्रकारही खवय्यांना खूपच आवडतो आहे.

- सारिका पूरकर- गुजराथीपार्टी किंवा सेलिब्रेशन याचं दुसरं नाव म्हणजे आइस्क्रिम. खिशाला परवडणारी किंमत, भरपूर चवींची व्हरायटी यामुळे आइस्क्रिमचा एक स्कूप अनेकांच्या चेहर्यावर हसू फुलवतो. गप्पांच्या मैफली आइस्क्रिममुळे आणि आइस्क्रिमसोबत आणखीनच खुलतात . त्यामुळे या आइस्क्रिमची ही भुरळ पुढील कित्येक वर्षं तरी खवय्यांच्या जिभेवर अशीच राहणार आहे. सध्या मात्र या आइस्क्रिमनेही मेकओव्हर केला आहे. आइस्क्रिमच्या या नव्या रूपाची भुरळ आइस्क्रि मप्रेमींना, विशेष करून नवी दिल्लीतील आइस्क्रिमप्रेमींना पडली आहे. होय, दिल्लीकरांना सध्या आइस्क्रिम नूडल्स हा आइस्क्रिमचा नवा अवतार चाखण्यास मिळतोय.

आइस्क्रिम नूडल्स हा हटके ट्रेण्ड भारतात झपाट्यानं लोकप्रिय होणार याची चाहुल दिल्लीकरांनी दिलीय.. म्हणूनच आइस्क्रि म नूडल्सचा बोलबाला सध्या सोशल मीडियावरही भरपूर होताना दिसतोय. आइस्क्रि मचा हा नवा प्रकार आपण ट्राय केल्याचे अपडेट्स, स्टेटस सोशल मीडियावर पोस्ट होताहेत.या आइस्क्रिम नूडल्ससोबचे सेल्फीज, फोटोज याचाही मारा होताना दिसतोय..

 

आइस्क्रिम नूडल्स नेमकं आहे काय हे?चायनीज हक्का नूडल्स मस्त चॉपस्टिक्सवर घेवून तोंडात घेण्याची मज्जाच काही और असते. तीच मज्जा आइस्क्रि म नूडल्स खातानाही येते बरं का! दिसायला नूडल्ससारख्याच लांबलचक असतात या नूडल्स, परंतु प्युअर आइस्क्रि मपासून नाही तर बाष्पीभवन केलेलं दूध आणि बर्फ यांचं एक मिश्रण तयार करून त्याला नूडल्सचा आकार देण्यात आलेला आहे. आणि या नूडल्स मग आइस्क्रिम बाऊलमध्ये आइस्क्रिमवर सर्व्ह केल्या जातात. दिसायला या नूडल्स पारदर्शक असतात, जसे जेली चॉकलेट्स असतात ना अगदी तशाच. छान कलरफूलही असतात या नूडल्स. पीच, ब्राऊन शुगर, हनी ( मध) , ग्रीन टी अशा स्वादांमध्ये या नूडल्स मिळतात. अगदी थंडगार आणि चवीला गोड अशा या नूडल्स आइस्क्रिम बाऊलमध्ये घातल्यावर नूडल्स खाऊ की आइस्क्रिम अशा पेचात खाणारा पडतोच.कुठून आला हा प्रकार?आइस्क्रिम नूडल्स या अनोख्या आणि हटके प्रकाराचा उगम न्यूयॉर्कमधील डेझर्ट किचन या हॉटेलमधला आहे.. तसेच जपानधील जेली नूडल्सच्या धर्तीवरच या नूडल्सचा लूक पाहायला मिळतो. जपानमध्ये जेली नूडल्स हा एक पारंपरिक प्रकार म्हणून लोकप्रिय आहे. अमेरिकेत 8 डॉलर्सला आइस्क्रि म नूडल्स मिळतात तर भारतात म्हणजे सध्या दिल्लीत 99 रुपयात मिळतात.

 

 

रोलअप आणि टाकोज आइस्क्रिमआइस्क्रिम नूडल्सबरोबरच आइस्क्रि मला नव्या ढंगात, नव्या रूपात सादर करण्याचे अनेक प्रयोग सध्या सुरु आहेत. विशेष म्हणजे ते लोकप्रियदेखील होत आहेत आणि नवे ट्रेण्ड्स म्हणून ओळखले जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे रोलअप आइस्क्रिम. हा देखील खूप हटके प्रकार आहे.. थायलंड, मलेशियातील हा प्रकार भारतातही (सध्या तरी दिल्लीत ) फेमस होतोय. फ्राइड आइस्क्रि म म्हणूनही हा प्रकार ओळखला जातो. आइस्क्रिम थाळीत पसरवून विशिष्ट मशीनच्या सहाय्यानं 40 डिग्री अंश सेल्सिअस तापमानाला ते फ्राय केलं जातं. आणि लगेचच थोड्या कडक झालेल्या आइस्क्रिमचे सुरळीच्या वड्या कापतो तसे रोल्स कापले जातात. हे रोल्स मग सजवून सर्व्ह केले जातात.

जपानच्या टाकोज धर्तीवर आइस्क्रिम टाकोज हा अगदी नवीन प्रकारही खवय्यांना खूपच आवडतो. कोनसाठी जे वेफर वापरतात तेच वेफर टाकोजच्या आकारात तयार करु न त्यात विविध फ्लेवर्सचे आइस्क्रिम स्कूप्स, भरपूर चॉकलेट चिप्स, स्प्रिंकलर्स, नट्स याची सजावट करून हे टाकोज सर्व्ह केले जातात.