शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घरी बनवा या चटपटीत डिश आणि पाऊस करा एन्जॉय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 19:20 IST

पाऊस म्हटलं की खाणं चटपटीत खाण्याची इच्छा होतेच ! पण बाहेरच तेलकट आणि अस्वच्छ खाण्यापेक्षा तुम्ही घरीही काहीतरी सोपं, चवदार, चटपटीत बनवू शकता. हे पदार्थ बनवून घरच्यांना खुश करा आणि बनवा तुमचा पावसाळा चविष्ट. 

पुणे :  पाऊस म्हटलं की खाणं चटपटीत खाण्याची इच्छा होतेच ! पण बाहेरच तेलकट आणि अस्वच्छ खाण्यापेक्षा तुम्ही घरीही काहीतरी सोपं, चवदार, चटपटीत बनवू शकता. हे पदार्थ बनवून घरच्यांना खुश करा आणि बनवा तुमचा पावसाळा चविष्ट. 

स्वीटकॉर्न भजी :

कांदाा किंवा बटाटा भजी सगळ्यांना माहिती आहे. पण उकडून  मिक्सरमध्ये क्रश केलेले स्वीटकॉर्न, डाळीचं पीठ, एक चमचा तांदूळ पीठ, तिखट, मीठ आणि भरपूर कोथिंबीर घातलेले कॉर्न भजीही भन्नाट लागतात. 

फ्लॉवरचे मंचुरियन 

पाण्यात मीठ घालून वाफवलेले फ्लॉवरचे मोठे तुकडे बाहेर काढून त्यांना मैदा, कॉर्नफ्लोअर, तिखट, मीठ, आले लसणाचे वाटण घातलेल्या पिठातून काढून तळावेत. दुसऱ्या कढईत चायनीजच्या सोया, चिली, टोमॅटो सॉस घालून परतून घालून परतावे. कोथिंबीर घालून सर्व करा झटपट फ्लॉवर मंचुरियन. 

चटपटीत वांगी :

कॉर्नफ्लोअर, तिखट, मीठ, एक चमचा तांदुळाचे पीठ एकत्र करून पातळ घोळ करावा. मोठी वांगी गोल चकत्यांमध्ये कापून पाण्यात टाकावी. एकेक चकती पिठात घोळवून तव्यावर शॅलो फ्राय करावी. सर्व्ह करताना वरून थोडासा चाट मसाला भुरभुरावा. 

क्रिस्पी भेंडी : 

भेंडी उभी, पातळ चिरून भांड्यात घ्यावी. त्यावर मीठ, लाल तिखट, कॉर्नफ्लोअर टाकून भेंडीत असलेल्या ओलाव्यातच भिजवावे. मावेल तेवढेच पीठ टाकावे. पाणी वापरू नये. तापलेल्या तेलात ही भेंडी तळून घ्यावी. सर्व्ह करताना लाल तिखट आणि चाट मसाला टाकावा. कुरकुरीत भेंडी तयार. 

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नRainपाऊस