रणवीरच्या 'धुरंधर'ला पछाडलं! २ तास २० मिनिटांच्या 'या' चित्रपटाचा ओटीटीवर बोलबाला, कुठे बघाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 15:07 IST2026-04-22T15:03:36+5:302026-04-22T15:07:21+5:30

६ कोटी बजेट अन् कमाई तब्बल...; ओटीटीवर ट्रेंडिंग आहे 'हा' सिनेमा, 'धुरंधर'ला टाकलं मागे, तुम्ही पाहिलात का?

youth 6 crore budget tamil movie trending on ott beats ranveer singh dhurandhar where to watch | रणवीरच्या 'धुरंधर'ला पछाडलं! २ तास २० मिनिटांच्या 'या' चित्रपटाचा ओटीटीवर बोलबाला, कुठे बघाल?

रणवीरच्या 'धुरंधर'ला पछाडलं! २ तास २० मिनिटांच्या 'या' चित्रपटाचा ओटीटीवर बोलबाला, कुठे बघाल?

OTT Cinema: हल्ली ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे सिनेप्रेमींसाठी मनोरंजनाचं एक नवीन माध्यम खुलं झालं आहे.त्यामुळे वेगवेगळे सिनेमे, सीरिज प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहणं शक्य आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.  अशाच एका चित्रपटाबद्दल ओटीटीप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. हा चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.तसेच टोस्टर आणि धुरंधर सारख्या चित्रपटांना देखील या चित्रपटाने मागे टाकलं आहे.

एकीकडे मनोरंजनविश्वात रणवीरच्या 'धुरंधर २' ची चर्चा आहे. तर दुसरीकडे याचा पहिला भाग म्हणजेच धुरंधर ने बॉक्स ऑफिसनंतर ओटीटीवर दबदबा निर्माण केला होता. या चित्रपटाला आता टक्कर देत एक चित्रपटाने ओटीटीवर पहिलं स्थान पक्क केलं आहे.दरम्यान, या चित्रपटाचं नाव 'युथ' असं आहे. २ तास २० मिनिटांच्या या तमिळ चित्रपटाची सध्या ओटीटी प्रेमींमध्ये तुफान चर्चा आहे.१९ मार्च रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला. त्यानंतर १६ एप्रिलला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. ओटीटीवर रिलीज होताच हा चित्रपट नेटफ्लिक्सच्या 'टॉप १० ट्रेंडिंग' यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या पाच प्रमुख भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.शिवाय सिनेमाच्या कथेला प्रेक्षकांकडून वाहवाह मिळते आहे. या चित्रपटाला IMDb वर ७.१ चे रेटिंग मिळाले आहे.

युथ चित्रपटात कोणतेही अॅक्शन सीन्स किंवा सस्पेन्स नाहीतर एका शालेतील मुलाची कथा दाखवण्यात आली आहे. ही कथा प्रवीण नावाच्या १५ वर्षांच्या मुलाभोवती फिरते. दहावीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर, अकरावीत प्रवेश केल्यावर प्रवीणच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळते.ज्याची प्रेमासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असते. 

अवघ्या ६ कोटी रुपयांच्या  बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ५२.२६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. जागतिक स्तरावर, या चित्रपटाने ७१.३३ कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचं सांगितलं  जातंय.तज्ज्ञांच्या मते, बजेटपेक्षा कित्येक पटींनी अधिक नफा कमावणारा हा चित्रपट २०२६ सालातील सर्वाधिक नफा कमावणारा चित्रपट ठरला आहे.

Web Title : रणवीर की 'धुरंधर' को 'युथ' ने पछाड़ा, जानिए ओटीटी पर कहाँ देखें!

Web Summary : तमिल फिल्म 'युथ', एक युवा कहानी, नेटफ्लिक्स की ट्रेंडिंग लिस्ट में सबसे ऊपर, 'धुरंधर' को पछाड़ दिया। ₹6 करोड़ के बजट पर बनी, इसने दुनिया भर में ₹71.33 करोड़ कमाए। प्रवीण का जीवन 10वीं कक्षा की परीक्षा के बाद बदल जाता है।

Web Title : 'Youth' movie surpasses 'Dhurandhar' on OTT, know where to watch.

Web Summary : Tamil film 'Youth,' a coming-of-age story, tops Netflix's trending list, surpassing 'Dhurandhar.' Made on a budget of ₹6 crore, it earned ₹71.33 crore worldwide. Praveen's life changes after his 10th-grade exams.