Panchayat 4: फक्त एक क्लिक आणि प्रदर्शनाआधीच बघता येईल 'पंचायत ४', कसं? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 17:30 IST2025-06-06T17:29:51+5:302025-06-06T17:30:25+5:30

'पंचायत ४' २ जुलै रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. पण, त्याआधी सीरिजच्या मेकर्सने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.

Panchayat 4 new promo you can watch series before 2 july how know about it | Panchayat 4: फक्त एक क्लिक आणि प्रदर्शनाआधीच बघता येईल 'पंचायत ४', कसं? जाणून घ्या

Panchayat 4: फक्त एक क्लिक आणि प्रदर्शनाआधीच बघता येईल 'पंचायत ४', कसं? जाणून घ्या

'पंचायत' ही ओटीटीवरील सर्वात गाजलेल्या वेब सीरिजपैकी एक आहे. कोणताही बोल्ड कंटेट नाही, एका साध्या गावातली कथा सांगणारी ही वेब सीरिज प्रेक्षकांना भावली. यातल्या पात्रांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आता या सीझनचा पुढचा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पंचायत ४' २ जुलै रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. पण, त्याआधी सीरिजच्या मेकर्सने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. 

'पंचायत ४' वेब सीरिज वेळेआधीच प्रदर्शित केली जाऊ शकते. पण, त्याआधी चाहत्यांना एक छोटी गोष्ट करावी लागणार आहे. 'पंचायत ४'चा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. फुलेरा गावात निवडणुका होत असल्याचं 'पंचायत ४'मध्ये पाहायला मिळणार आहे. यासाठी मंजू देवी आणि क्रांती देवीमध्ये लढत होणार आहे. आता नव्या प्रोमोमध्ये दोघींच्याही पार्टीकडून प्रचारासाठी पार्टी साँग तयार करण्यात आल्याचं दिसत आहे. यामध्ये वेगवेगळी आश्वासने फुलेरा गावातील नागरिकांना मंजू देवी आणि क्रांतीदेवी देतात. ही निवडणूक जिंकण्यासाठी त्या चाहत्यांनाही आवाहन करत आहेत. 


मंजू देवी म्हणते, "जर तुम्ही लॉकीला समर्थन दिलं तर पंचायत ४ सीझन २ जुलैच्या आधी प्रदर्शित होईल". त्यावर क्रांती देवी म्हणते की "तुम्ही मला समर्थन दिलं तर मंजू देवीच्या आधी पंचायत ४ सीझन प्रदर्शित होईल". 'पंचायत ४' च्या या नव्या प्रोमोच्या कॅप्शनमध्ये लिंकही देण्यात आली आहे. यावर जाऊन तुम्हाला मंजू देवी किंवा क्रांती देवीला वोट करायचं आहे. त्यानुसार 'पंचायत ४'चा सीझन रिलीज डेटच्या आधी प्रदर्शित केला जाऊ शकतो. 

दरम्यान, दीपक कुमार मिश्रा यांचं दिग्दर्शन असलेल्या 'पंचायत ४'मध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय हे कलाकार आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते 'पंचायत ४'ची वाट बघत आहेत. 
 

Web Title: Panchayat 4 new promo you can watch series before 2 july how know about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.