विजयने मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच तृषा कृष्णनची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली - 'मी खूप...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 13:48 IST2026-05-10T13:45:58+5:302026-05-10T13:48:33+5:30

दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयने तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने सर्वांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. विजयच्या या विजयामुळे त्याचे कुटुंबीय, चाहते आणि संपूर्ण राज्यात सध्या उत्सवाचे वातावरण आहे.

Trisha Krishnan first reaction as Thalapathy Vijay takes oath as Tamil Nadu Chief Minister | विजयने मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच तृषा कृष्णनची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली - 'मी खूप...'

विजयने मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच तृषा कृष्णनची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली - 'मी खूप...'

दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयनेतामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने सर्वांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. विजयच्या या विजयामुळे त्याचे कुटुंबीय, चाहते आणि संपूर्ण राज्यात सध्या उत्सवाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पवन कल्याण, कमल हासन आणि प्रकाश राज यांसारख्या दिग्गजांनी विजयचे अभिनंदन केले असतानाच, आता अभिनेत्री तृषा कृष्णन हिची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

मी खूप आनंदी आहे

थलपती विजयच्या आयुष्यातील मोठ्या क्षणासाठी उपस्थित राहताना तृषाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. ती म्हणाली, "मी खूप उत्साही असून या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. विजयचे खूप खूप अभिनंदन. मी मनापासून आनंदी आहे." जेव्हा तिला विजयच्या समर्थकांसाठी काही संदेश देण्यास सांगितले, तेव्हा तिने सर्व विजयच्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार मानले आणि त्यांचेही अभिनंदन केले.

शपथविधी सोहळ्याला तृषाची विशेष उपस्थिती

१० मे २०२६ रोजी चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर थलपती विजयचा भव्य शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला विजयचे कुटुंबीय, राजकीय नेते आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार उपस्थित होते. अभिनेत्री तृषा कृष्णनने देखील या सोहळ्याला हजेरी लावून विजयच्या या ऐतिहासिक प्रवासाची साक्षीदार होण्याचा मान मिळवला.

वाढदिवस आणि विजयाचा योगायोग

विशेष म्हणजे, ४ मे रोजी जेव्हा तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, तेव्हा तृषाचा वाढदिवस होता. त्या दिवशी ती तिरुपती मंदिरात दर्शनासाठी गेली होती आणि तिथून परतल्यानंतर तिने थेट विजयच्या घरी जाऊन त्याचे अभिनंदन केले होते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जेव्हा विजय स्टेडियमबाहेर आला, तेव्हा त्याने हात जोडून सर्वांचे आभार मानले. अनेक वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीनंतर आता विजय राजकारणाच्या माध्यमातून तमिळनाडूच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे.

Web Title : विजय के मुख्यमंत्री बनते ही तृषा कृष्णन की पहली प्रतिक्रिया: 'मैं बहुत...'

Web Summary : विजय के तमिलनाडु के मुख्यमंत्री पद की शपथ लेने पर तृषा कृष्णन ने खुशी जताई। उन्होंने उत्साह व्यक्त किया और विजय को बधाई दी। समारोह में परिवार, राजनीतिक नेता और फिल्म उद्योग के लोग शामिल हुए। तृषा ने अपने जन्मदिन पर विजय को उनकी चुनावी जीत पर भी बधाई दी थी।

Web Title : Trisha Krishnan's first reaction as Vijay sworn in as Chief Minister

Web Summary : Trisha Krishnan expressed joy at Vijay's swearing-in as Tamil Nadu's Chief Minister. She conveyed excitement and congratulated Vijay. The ceremony was attended by family, political leaders, and film industry figures. Trisha had also congratulated Vijay on his election win on her birthday.