‘ठिपक्यांची रांगोळी’तील शशांक ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात! सोशल मीडियावर चर्चा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 13:30 IST2021-11-08T13:28:33+5:302021-11-08T13:30:08+5:30

स्टार प्रवाह वाहिनीवरची ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli ) ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. मालिका लोकप्रिय झाल्यावर साहजिकच मालिकेत काम करणारे कलाकारही चर्चेत येतात. तूर्तास चर्चा आहे ती शशांकची.

Thipkyanchi Rangoli fame Shashank Aka Chetan Vadnere Dating with Rujuta Dharap | ‘ठिपक्यांची रांगोळी’तील शशांक ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात! सोशल मीडियावर चर्चा!!

‘ठिपक्यांची रांगोळी’तील शशांक ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात! सोशल मीडियावर चर्चा!!

स्टार प्रवाह वाहिनीवरची ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli ) ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. मालिका लोकप्रिय झाल्यावर साहजिकच मालिकेत काम करणारे कलाकारही चर्चेत येतात. तूर्तास चर्चा आहे ती शशांकची. अर्थात मालिकेत शशांकची भूमिका साकारणारा अभिनेता चेतन वडनेरे (Chetan Vadnere) याची. होय, सध्या चेतनच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. चेतन मराठमोळी अभिनेत्री ऋजुता धारप (Rujuta Dharap) हिला डेट करत असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
चेतनने नुकताच ऋतुजासोबतचा फोटो शेअर केला. हा फोटो बघता, दोघेही प्रेमात पडल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच ऋतुजा व चेतन लेह-लडाखच्या ट्रिपवर गेले होते. तेव्हाही दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली होती.

‘फुलपाखरू’ या मालिकेत ऋतुजा व चेतन यांनी एकत्र काम केलं होतं. याच मालिकेच्या सेटवर दोघांत प्रेम फुलल्याची चर्चा आहे. अर्थात दोघांनीही यावर मौन बाळगलं आहे.

अभिनेता चेतन वडनेरे हा झी मराठीवरील ‘अल्टी पल्टी सुमडीत कल्टी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसला होता. चेतन मूळचा नाशिकचा आहे. अभिनयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मुंबईत आला. नाटक, एकांकिका गाजवत असताना स्टार प्रवाहवरील ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेत त्याला   छोटीशी भूमिका मिळाली होती. यानंतर झी युवा वरील ‘फुलपाखरू’ या लोकप्रिय मालिकेत तो झळकला होता.
 ऋतुजाबद्दल सांगायचं तर ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत निगेटीव्ह भूमिकेत तुम्ही तिला पाहिलं असेलच. याशिवाय वर्तुळ, क्राईम पॅशन, घरात मॅरीड बाहेर बॅचलर अशा मालिका आणि नाटकांमधून ऋजुतानं वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती सन टीव्ही मराठी या वाहिनीवरील ‘जाऊ नको दूर बाबा’ या मालिकेत काम करतेय.


 

Web Title: Thipkyanchi Rangoli fame Shashank Aka Chetan Vadnere Dating with Rujuta Dharap