Video: ऊफ्फ्फ तेरी अदा! माधुरी दीक्षितच्या गाण्यावर स्वीटूचा अफलातून डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 05:44 PM2021-10-05T17:44:00+5:302021-10-05T17:44:00+5:30

Anvita phaltankar: कलाविश्वाप्रमाणेच अन्विता सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असून अनेकदा ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

yeu kashi tashi me nandayla fame actress anvita phaltankar share dance video | Video: ऊफ्फ्फ तेरी अदा! माधुरी दीक्षितच्या गाण्यावर स्वीटूचा अफलातून डान्स

Video: ऊफ्फ्फ तेरी अदा! माधुरी दीक्षितच्या गाण्यावर स्वीटूचा अफलातून डान्स

googlenewsNext
ठळक मुद्देआज अन्विताचा खूप मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अन्विता फलटणकर. या मालिकेत अन्विताने स्वीटू ही भूमिका साकारली असून कमी कालावधीत तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज अन्विताचा खूप मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतं. कलाविश्वाप्रमाणेच अन्विता सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असून अनेकदा ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यात खासकरुन तिच्या डान्सच्या व्हिडीओला प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळते. त्यामुळेच स्वीटूने म्हणजेच अन्विताने नुकताच एक नवा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. 

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या स्वीटूने अलिकडेच एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने माधुरी दीक्षितच्या बडी मुश्किल बाबा बडी मुश्किल या गाण्यावर ताल धरल्याचं दिसून येत आहे. 

लकी अलीच्या 'ओ सनम'वर स्वीटूचा मनमोहक डान्स; एक्स्प्रेशनमुळे जिंकली नेटकऱ्यांची मनं

माधुरी दीक्षितचं हे गाणं त्याकाळी तुफान गाजलं होतं. माधुरीच्या एक्स्प्रेशन्समुळे तिने अनेकांची मनं जिंकली होती. त्यानंतर याच गाण्यामध्ये स्वीटूने नवा ट्विस्ट आणून तिच्या पद्धतीने हे गाणं सादर केलं आहे. विशेष म्हणजे माधुरीप्रमाणेच स्वीटूलादेखील प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

दरम्यान, अभिनेत्री अन्विता फलटणकर 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून यापूर्वी तिने अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'टाइमपास' या चित्रपटातही ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे. 
 

Web Title: yeu kashi tashi me nandayla fame actress anvita phaltankar share dance video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.