'आम्ही दोघे राजा राणी' नवी मालिका रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 13:42 IST2016-11-09T13:42:33+5:302016-11-09T13:42:33+5:30

रोमँटिक स्टोरी पाहणे रसिकांच्या आवडीचा विषय असतो. कधी त्या सिनेमात रंगतांना तर कधी छोट्या पडद्यावरच्या रोमँटिक कथेला रसिक अधिक ...

'We are both Raja Rani', a new series of comedians | 'आम्ही दोघे राजा राणी' नवी मालिका रसिकांच्या भेटीला

'आम्ही दोघे राजा राणी' नवी मालिका रसिकांच्या भेटीला

मँटिक स्टोरी पाहणे रसिकांच्या आवडीचा विषय असतो. कधी त्या सिनेमात रंगतांना तर कधी छोट्या पडद्यावरच्या रोमँटिक कथेला रसिक अधिक पसंती देताना दिसतात. आम्ही दोघे राजा राणी म्हणत पार्थ आणि मधुरा यांची रोमँटिक स्टोरी लवकरच रसिकांना पाहायला मिळणार आहे. 'आम्ही दोघे राजा राणी' ही एक नवी कोरी मालिका 14 नोव्हेंबरपासून छोट्या पडद्यावर एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. पार्थ आणि मधुरा यांचे कुटुंब थोडे अतरंगी असते. एकत्र कुटुंबात वाढलेल्या या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम असते. मात्र त्यांचे अतरंगी कुटुंब या दोघांच्या प्रेमकहाणीत तडका लावताना  दिसणार आहेत.अतिशय मनोरंजक असे कथानक तितक्याच खुमासदारपणे मांडण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबासह पाहता येण्यासारखी ही कौटुंबिक रोमँटिक मालिका रसिकांच्या भेटीला येत आहे.विजय पटवर्धन,समीर चौघुले आणि अभिजित पेंढारकर यांनी मालिकेचं लेखन केले असून, संचित वर्तकने मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. मंदार कुलकर्णी,दीप्ती लेले या गोंडस जोडी सोबत मिलिंद फाटक, विनय येडेकर, मैथिली वारंग, सुलेखा तळवलकर,शीतल शुक्ल कलाकार मालिकेत झळकणार आहेत. 


Web Title: 'We are both Raja Rani', a new series of comedians