KBC 11 : वसईच्या चिमुकलीने केली बिग बींची 'बोलती बंद'; किड्स स्पेशल शो मध्ये धमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 01:23 PM2022-12-07T13:23:22+5:302022-12-07T13:23:29+5:30

'कौन बनेगा करोडपती' मध्ये सध्या किड्स स्पेशल शो सुरु आहे. लहान शाळकरी मुलं अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसिटवर बसले आहेत.

vasai-girl-anvisha-make-big-b-amitabh-bachchan-to-shut-his-mouth | KBC 11 : वसईच्या चिमुकलीने केली बिग बींची 'बोलती बंद'; किड्स स्पेशल शो मध्ये धमाल!

KBC 11 : वसईच्या चिमुकलीने केली बिग बींची 'बोलती बंद'; किड्स स्पेशल शो मध्ये धमाल!

googlenewsNext

'कौन बनेगा करोडपती' मध्ये सध्या किड्स स्पेशल शो सुरु आहे. लहान शाळकरी मुलं अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसिटवर बसले आहेत. त्यातल्याच एका चिमुकलीने थेट अमिताभ बच्चन यांची बोलतीच बंद केली आहे. तिची एकुणच बडबड पाहून अमिताभ म्हणतात 'आपने तो हमारी बोलती बंद कर दी'.

ही चिमुकली आहे ११ वर्षांची अनविशा त्यागी. फास्टेट फिंगर राऊंड जिंकून ती हॉटसीटवर पोहोचली. अनविशा वसईची आहे. खोडकर, हजरजबाबी आणि बडबड्या अनविशाने बिग बींचे चांगलेच मनोरंजन केले. बॉलिवुडच्या महानायकासमोर न घाबरता तिने बिंधास्त गप्पा मारल्या आहेत. त्यांना प्रश्न विचारुन परेशान केले आहे. अमिताभ यांनी तिच्या आयुष्यातील काही गोष्टींचा भांडाफोड केला. म्हणुन ती म्हणाली, मी पण तुमचा भांडाफोड करणार. असं म्हणत तिने अमिताभ यांना असंख्य प्रश्न विचारले. यावर अमिताभ मात्र अमिताभ यांचीही बोलती बंद झाली. 

त्याचे झाले असे अनविशाने बिग बींच्या कानात सांगितले की तिची आई गणिताची शिक्षिका आहे. पण तिला गणित विषय आवडत नाही. हे आईला सांगू नका असे ती म्हणाली असता बिग बी तरी कुठे ऐकताएत. त्यांनी लगेच तिच्या आईला सांगून दिले. याचाच बदला घेत अनविशाने अमिताभ यांना विचारले, तुम्ही असे काही केले आहे की ज्यामुळे तुम्हाला मुख्याध्यापकांनी पकडले असेल. अनविशाच्या या प्रश्नावर बिग बी म्हणाले 'आपने तो मेरी बोलती बंद कर दी.'

Web Title: vasai-girl-anvisha-make-big-b-amitabh-bachchan-to-shut-his-mouth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.