वहिनीसाहेबांची नवऱ्यासाठी रोमँटिक पोस्ट, फोटो शेअर करत दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 15:09 IST2022-12-07T15:08:50+5:302022-12-07T15:09:18+5:30

Dhanashri Kadgaonkar: धनश्री काडगावकरच्या लग्नाचा वाढदिवस असून या निमित्ताने तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

Vahinisaheb shared a romantic post and photo for her husband and wished her a happy wedding anniversary! | वहिनीसाहेबांची नवऱ्यासाठी रोमँटिक पोस्ट, फोटो शेअर करत दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

वहिनीसाहेबांची नवऱ्यासाठी रोमँटिक पोस्ट, फोटो शेअर करत दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ( Tuzyat Jeev Rangala) या मालिकेत नंदिनी वहिनी साहेबांची भूमिका अभिनेत्री धनश्री काडगावकर ( Dhanashri Kadgaonkar) हिने साकारली होती. ही भूमिका साकारून तिने तुफान लोकप्रियता मिळवली होती. मालिका संपली असली तरी वहिनी साहेबांना लोक विसरू शकलेले नाही. प्रेग्नंसीमुळे धनश्रीने अर्ध्यावर ही मालिका सोडली होती. मात्र आता आई झाल्यावर, धनश्री पुन्हा छोट्या पडद्यावर परतली आहे. ‘तू चाल पुढं’ या मालिकेत ती शिल्पीची भूमिका साकारताना दिसते आहे. आज धनश्री काडगावकरच्या लग्नाचा वाढदिवस असून या निमित्ताने तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

धनश्री काडगावकर हिने इंस्टाग्रामवर नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिले की,  एकमेकांच्या डोळ्यात पाहणे शक्तिशाली आणि जिव्हाळ्याचे आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पार्टनर. दुर्वेश देशमुख माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. धनश्रीच्या पोस्टवर चाहते लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

२०१३ मध्ये धनश्रीने दुर्वेशसोबत लग्नगाठ बांधली. त्या दोघांना एक मुलगा आहे. धनश्रीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर माझिया प्रियाला प्रित कळेना या मराठी मालिकेतून धनश्रीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर गंध फुलांचा गेला सांगून, जन्मगाठ या मालिकेतूनही धनश्री प्रेक्षकांसमोर आली होती. मात्र तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून धनश्री घराघरात पोहचली. तिची वहिनीसाहेब ही भूमिका चांगलीच गाजली.

Web Title: Vahinisaheb shared a romantic post and photo for her husband and wished her a happy wedding anniversary!