'कहानी घर घर की' फेम अभिनेत्याची धक्काबुक्की, अभिनेत्रीशी गैरवर्तन; भांडणाचा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 18:43 IST2026-02-03T18:43:09+5:302026-02-03T18:43:50+5:30

Upasana Singh And Deepak Qazir Kejriwal : 'द कपिल शर्मा शो' फेम अभिनेत्री आणि CINTAA ची जनरल सेक्रेटरी उपासना सिंग आणि 'कहानी घर घर की' फेम अभिनेते दीपक काजिर केजरीवाल यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Upasana Singh Deepak Qazir Kejriwal republic day fight controversy video viral | 'कहानी घर घर की' फेम अभिनेत्याची धक्काबुक्की, अभिनेत्रीशी गैरवर्तन; भांडणाचा Video व्हायरल

'कहानी घर घर की' फेम अभिनेत्याची धक्काबुक्की, अभिनेत्रीशी गैरवर्तन; भांडणाचा Video व्हायरल

'द कपिल शर्मा शो' फेम अभिनेत्री आणि CINTAA ची जनरल सेक्रेटरी उपासना सिंग आणि 'कहानी घर घर की' फेम अभिनेते दीपक काजिर केजरीवाल यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघांमध्ये मोठा वाद होताना दिसत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या एका खास कार्यक्रमादरम्यान दीपक यांनी आपल्याशी गैरवर्तन केलं आणि चुकीच्या पद्धतीने बोलले असा आरोप उपासना  यांनी केला आहे. हे प्रकरण केवळ वादापुरते मर्यादित राहिलं नसून दीपक यांनी तिथे धक्काबुक्की केल्याचाही आरोप आहे.

उपासना आणि दीपक यांच्यात कडाक्याचे भांडण व्हायरल होत असलेला व्हिडीओ प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातील असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये दीपक हे उपासना यांना खडेबोल सुनावताना दिसत आहेत. या वादाची नेमकी सुरुवात कुठून झाली, याचा उल्लेख व्हिडिओमध्ये नाही. दीपक हे उपासना यांच्यावर ओरडताना स्पष्ट दिसत आहेत. उपासना माईकवरून आपलं म्हणणं मांडत असताना दीपक त्यांना मध्येच टोकतात. जेव्हा उपासना म्हणतात, "सर, मी बोलत आहे" तेव्हा दीपक रागात उत्तर देतात, "नाही, तुम्ही बोलणार नाही. आत्ताच मनोज शर्मा यांनी चुकीचं वक्तव्य केलं आहे." यावर उपासना म्हणतात, "यालाच नकारात्मकता म्हणतात."


त्यानंतर तिथे उपस्थित असलेला एक व्यक्ती माईक हातात घेऊन 'भारत माता की जय'च्या घोषणा देतो आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, दीपक तिथेच थांबत नाहीत, ते त्या व्यक्तीच्या हातातील माईक हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात. व्हिडिओच्या एका भागात उपासना रागाने दीपक यांना सांगतात की, "मी सिन्टा (CINTAA) ची जनरल सेक्रेटरी आहे." 

दीपक त्यावर उत्तर देतात, "मी इथला व्हाईस प्रेसिडेंट होतो." हे ऐकून उपासना अधिकच संतापतात आणि म्हणतात, "होता, आता नाही आहात." त्यानंतर कॅमेऱ्याकडे पाहून त्या सांगतात की, दीपक यांनी तिथे उपस्थित असलेले कार्यकारी समितीचे सदस्य विकास वर्मा यांना धक्काबुक्की केली आणि सर्वांसमोर त्यांना धमकावलं. "यांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे आणि आता ते महिलांशीही गैरवर्तन करत आहेत" असं उपासना व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत. या घटनेनंतर कलाकार आणि चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. CINTAA ने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, प्रजासत्ताक दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी अशी घटना का घडली? याची चौकशी सुरू केली आहे.

Web Title : 'कहानी घर घर की' अभिनेता ने की मारपीट, अभिनेत्री से दुर्व्यवहार; वीडियो वायरल

Web Summary : एक वीडियो में अभिनेता दीपक काजिर केजरीवाल अभिनेत्री उपासना सिंह के साथ बहस करते दिख रहे हैं। सिंह ने केजरीवाल पर दुर्व्यवहार, अपने सहकर्मी को धक्का देने और दूसरों को धमकाने का आरोप लगाया है। सिंटा मामले की जांच कर रही है।

Web Title : 'Kahaani Ghar Ghar Kii' actor assaults, misbehaves with actress; video goes viral

Web Summary : A video shows actor Deepak Kazir Kejriwal arguing with actress Upasana Singh at an event. Singh accuses Kejriwal of misbehaving, pushing her colleague, and threatening others. CINTAA is investigating the incident.