५ वर्षांतच संसार मोडला, कर्जबाजारी झाली होती रश्मी देसाई, म्हणाली- "रस्त्यावर राहायचे आणि..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 08:52 IST2024-07-29T08:51:45+5:302024-07-29T08:52:07+5:30

रश्मीने अभिनेता नंदिश संधूशी लग्न करत संसार थाटला होता. मात्र अवघ्या पाचच वर्षांत तिचा संसार मोडला. यानंतर मात्र तिच्या आयुष्यात वादळ आलं होतं. घटस्फोटानंतर रश्मी कर्जबाजारी झाली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत तिने खुलासा केला. 

tv actress rashmi desai talk about her divorce and debt said i used to stay on road | ५ वर्षांतच संसार मोडला, कर्जबाजारी झाली होती रश्मी देसाई, म्हणाली- "रस्त्यावर राहायचे आणि..."

५ वर्षांतच संसार मोडला, कर्जबाजारी झाली होती रश्मी देसाई, म्हणाली- "रस्त्यावर राहायचे आणि..."

रश्मी देसाई हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'उतरन' या मालिकेमुळे रश्मी प्रसिद्धीझोतात आली होती. अनेक मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारून तिने कलाविश्वात आणि प्रेक्षकांच्या मनात तिचं स्थान निर्माण केलं. पण, करिअरमध्ये यशस्वी ठरलेल्या रश्मीला वैवाहिक आयुष्यात मात्र अपयश आलं. रश्मीने अभिनेता नंदिश संधूशी लग्न करत संसार थाटला होता. मात्र अवघ्या पाचच वर्षांत तिचा संसार मोडला. यानंतर मात्र तिच्या आयुष्यात वादळ आलं होतं. घटस्फोटानंतर रश्मी कर्जबाजारी झाली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत तिने खुलासा केला. 

नुकतंच रश्मीने पारस छाबडाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये तिने आयुष्यातील या कठीण काळाबद्दल भाष्य केलं. रश्मीने सांगितलं की नंदिशबरोबर लग्न केल्यानंतर तिचं आयुष्य बदलून गेलं होतं. त्यांच्यात वाद होऊ लागले. त्यातच रश्मीने घर खरेदी केल्यामुळे तिच्यावर कोटींचं कर्ज होतं. एकीकडे संसार तुटत असताना दुसरीकडे रश्मीवर ३ कोटींच्या कर्जाचा डोंगर होता. अशातच काम करत असलेला शोदेखील अचानक बंद झाला. त्यामुळे रश्मीवर रस्त्यावर राहण्याची वेळ आली होती. 


पुढे रश्मीने सांगितलं की घटस्फोट घेतल्यामुळे तिचे कुटुंबीय नाराज होते. रश्मीच्या कुटुंबीयांना तिचा हा निर्णय पटला नव्हता. त्यामुळे अभिनेत्रीने रस्त्यावरच गाडीत राहून दिवस काढले. २० रुपयांचं जेवण ती जेवायची. या सगळ्यामुळे रश्मी नैराश्यात गेली होती. त्यामुळे तिला Psoriasis नावाचा गंभीर आजारही झाला. या आजारामुळे रश्मीचं वजन वाढलं होतं. तिला लूकवरुनही ट्रोल केलं गेल्याचं अभिनेत्रीने सांगितलं. 

रश्मीने 'उतरन', 'दिल से दिल तक', 'परी हू मै', 'नागिन', 'तेरी धुन लागी रे', 'उडान' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'बिग बॉस', 'नच बलिये', 'झलक दिखला जा' या रिएलिटी शोमध्येही तिने सहभाग घेतला होता. 

Web Title: tv actress rashmi desai talk about her divorce and debt said i used to stay on road